१९ प. पू . श्रीगुरुजी
१
देश व समाजसेवेपुढे प्रत्यक्ष ईश्वरप्राप्तीचा व अन्य सर्व मोह व लाभ अत्यंत गौण आहेत हे पू . श्रीगुरुजींच्या जीवनचरित्रापासून स्वयंसेवक व अन्य लोकांनी शिकले पाहिजे . अंगीकृत कार्य आपल्या संपूर्ण शक्तीनिशी शेवटच्या क्षणापर्यंत करीत राहणे, कार्यानुकुल आपल्या व्यक्तिगत व पारिवारिक जीवनाची रचना करणे, आपल्या स्वभावात आवश्यक ते परिवर्तन करणे व कार्य सफल करणे हा आदर्श प . पू . श्रीगुरुजींच्या जीवनचरित्राने आपल्या समोर ठेवला आहे . - आप्पाजी जोशी

२
पू.
श्री गुरुजींचे व्यक्तित्व कोहिनूर हिर्याप्रमाणे शतमुखी तेज पसरविणारे होते.
हिऱ्यावर ज्या रंगाचा किरण पडतो तो त्यांचे तेज शंभर पटीने वाढवितो. असेच गुरुजींच्या
समोर जी परिस्थिती उपस्थित होइल, ते तिला अंतर्बाह्य़
दृष्टीने विश्लेषीत करुन त्यावर मात करण्याचे उपाय दाखवून त्या दिशेने सर्वात पुढे
पावले टाकीत असत. - मा. शेषाद्री
३
“तुम्ही निर्दोष,
निःस्वार्थ आणि निर्भय
माणसाचे जीवन चरित्र पाहत आहात, जे केवळ स्वतःसाठी नाही तर सर्वांसाठी पूर्णपणे जगले. जगात
किती लोकांविषयी असे म्हणता येईल? याहूनही महत्तम सांगायचे झाल्यास, श्री गोळवलकर गुरुजींनी
भारत आणि तेथील जनतेसाठी केलेली सेवा म्हणजे, त्यांनी नेहमीच स्वतःच्या वाणी व
कृतीतून त्या विशेष मूल्यांचे जतन केले, जी मुल्ये राष्ट्राच्या अस्तित्वासाठी आणि
सुव्यवस्थित विकासासाठी आवश्यक आहेत. रामकृष्ण आश्रमाचे पत्र
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा