१५. शासन- सरकार
१
हे हिंदुराष्ट्र सनातन आहे . पूर्वी होते, आजही आहे आणि पुढेही राहील . आम्हाला जर अशी स्थिती हवी असेल तर हे राष्ट्र व त्याचे समाजजीवन शासन निरपेक्ष व स्वायत्त म्हणजे स्वयंशासित असले पाहिजे . त्याच्या अनेक साधनांपैकी एक साधन म्हणजे शासन . यापेक्षा त्याचे अधिक महत्व नाही .

२
आपल्याकडे समाजजीवनाचा आधार धर्म होता, राज्य नव्हे. समाजाची धारणा धर्माच्या आधाराने होते, शासनाच्या आधाराने नव्हे. हे हिंदूंचे वैशिष्ट्य होते. शासन हे धर्माच्या निरनिराळ्या साधनांपैकी एक असू शकते. म्हणूनच त्याच्या आधारावर समाजाची धारणा होऊ शकणार नाही.
३
ज्या राष्ट्रात सरकार किंवा राज्यसत्ता सर्वशक्तिमान मानली जाते आणि प्रत्येक कामासाठी सरकारच्या, सत्तेच्या तोंडाकडे पाहिले जाते त्या राष्ट्राच्या नशिबी गुलामी येणे स्वाभाविक असते. सत्तेसमोर लाचार व परावलंबी राहता राहता लोकशाही क्षीण होत जाते. याचे उत्तम उदाहरण सोव्हिएट रशियाच्या रूपाने पहावयास मिळते. तेथे गेली साठ वर्षे सरकार आणि पक्ष यांच्या हातात सर्वाधिक शक्ती देऊन प्रजेला केवळ आश्रित बनविले गेले. परिणामतः तेथील व्यक्तीस्वातंत्र्य पूर्णतः नष्ट झाले. तेथील समाज जणू गुलाम बनला आहे. परंतु जेथे जनशक्ती जागृत असते तेथे सरकार किंवा शासन-सत्तेची मनमानी चालत नाही. तेथील सत्तेवर अंकुश लावला जाऊ शकतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा