बुधवार, २२ जून, २०१६

३५ कर्मयोगी

                                ३५  कर्मयोगी 
    
     आम्ही गौरवास्पद भूतकाळालाच राष्ट्रजीवनाचा परमोच्च बिंदू मानीत नाही . वर्तमानकाळाकडे आम्ही वास्तववादी दृष्टीतून पाहतो . पण त्याचेशी स्वतःलाच जखडून घेत नाही . आमच्या दृष्टीसमोर वैभवशाली भविष्याचे ' सोनेरी स्वप्न ' आहे . पण आम्ही स्वप्नाळू नाही तर त्या भविष्याला साकार करणारे जागृत कर्मयोगी आहोत . अनादी भूतकाळ, अस्थिर वर्तमानकाळ व अनंत भविष्यकाळ यांचेवर विजय मिळविणाऱ्या कालजयी हिंदू संस्कृतीचे आम्ही पुजारी आहोत . 
                                                                                                  - पं . दीनदयाळ उपाध्याय  

 जगाची नवीन जडणघडण करू पाहणारे वा नवसमाज निर्मू इच्छिणारे महापुरुष कधीही समाजाच्या पारंपारिक चाकोरीत बांधले जात नसतात . त्यांचे मनोधैर्य प्रबळ असल्यामुळे ते कालविरोधी जुनाट चालीरीती, परंपरा, रूढी नि निर्बंध यात अडकून पडत नाहीत. ते परंपरेला कालसुसंगत रूप देतात . अज्ञानी लोक मात्र रुढीच्या दास्यात राहतात . सामान्य जनता तिच्या आज्ञेत राहते . परंतु , जीवित ध्येयाने धुंद झालेले कर्मवीर आपल्या प्रतिभेनुरुप समाज निर्मिती करतात .              -  धनंजय कीर

         आपण कर्मठ झाले पाहिजे. आमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे. आपल्या पवित्र कार्याच्या योगाने संपूर्ण समाजाचे संघटन होईल. एक दिव्य शक्तिशाली सर्वगुणसंपन्न असे वैभवशाली राष्ट्र निर्माण होईल. त्याची ज्योत जगभर प्रकाश पसरवून सुख शांती देईल, अशा तऱ्हेचा श्रेष्ठ भाव अंतःकरणांमध्ये धारण करून आपली संपूर्ण शक्ती आपल्या कार्यावर केंद्रित करावी हीच सर्वांकडून अपेक्षा आहे.
       मनुष्यत्व मिळविण्याचा एकमेव उपाय म्हणजे त्याच्या विकासाच्या मार्गात निर्माण होणारा प्रत्येक अडथळा दूर करणे. जिथे कुठे अन्याय, अविचार दिसेल, तिथे निर्भयपणे उभे रहा, प्रतिकार करा आणि तो अन्याय नष्ट करण्यासाठी प्राणपणाने प्रयत्न करा. सध्याच्या काळात आत्मरक्षणार्थ आणि राष्ट्राच्या उद्धारासाठी आम्हाला जी शक्ती हवी आहे ती रानावनातील किंवा एकांत गुहातील तपश्चर्याने मिळणार नाही. ती निष्काम कर्मयोगाच्या मार्गाने संघर्षरत राहण्यानेच मिळेल.                 नेताजी सुभाष

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा