३१ ध्येय पथिक
१
१
एका महान ध्येयसिद्धीचे आपण साधन बनू या , ध्येयदेवतेच्या हातातील एक खेळणे बनू या . ध्येयदेवतेचे दास ! याहून श्रेष्ठतम पदवी दुसरी कोणती असणार ? जीवनाच्या कंटाकाकीर्ण मार्गावरून ध्येयध्रुवाकडे लढत - भिडत, संघर्ष करीत, आघात करीत आणि झेलत पुढेच जात राहू या . आता थांबणे नको, भीती नको, निराशा आणि मृत्यू यांच्या भयानक तांडवामध्येही आनंदाने धुंद होऊन, मोठ्या दिमाखात आपण पुढे आणि पुढेच जाऊ या आणि यश प्राप्त करूनच घेऊ या.
- भगिनी निवेदिता
२
संघाच्या ध्येयाची पूर्तता करण्याकरिता आपल्याला काय केले पाहिजे याची नीट जाणीव प्रत्येक स्वयंसेवकाने करून घेतली पाहिजे. आपल्यापैकी प्रत्येकाची हीच भावना पाहिजे कि मी आणि माझे सर्वस्व संघाकरता म्हणजे राष्ट्राकरता आहे. प्रत्येक स्वयंसेवकाच्या नसानसात देशप्रेमाची भावना असली पाहिजे. स्वयंसेवक केवळ हंगामी देशभक्त असून उपयोगी नाही. सर्व स्वयंसेवकांची वृत्ती जर याप्रमाणे संघमय झाली तर आपले ध्येय आपण लवकर गाठू शकू. - पु. डॉ. हेडगेवार
३
उज्ज्वल भारतवर्षाचे एक सुंदर चित्र तुमच्यापुढे असले पाहिजे. या ध्येयावर प्रेम करा. हे प्रेम सर्व विरोधी शक्तींना पुरुन उरेल. देशाच्या अणू-अणूवर तुमचे प्रेम असले पाहिजे. परिस्थितीला पायाखाली तुडवून ताठ उभे राहा. खरा पुरुष तो जो ऐन आत्मबलिदानातसुद्धा मृत्यूकडे निर्भय चित्ताने पाहील .
- भगिनी निवेदिता
४
संघ के सिद्धांत पर अटल श्रद्धा रखो | हिम्मत और आत्मविश्वास से काम लो | हम लोग स्वदेश, स्वधर्म और अपनी संस्कृती की रक्षा के लिये कटिबद्ध है | हमें सत्य का अधिष्ठान है | अत: किसी संकट से भयभीत होने का या घबराने का कोई भी कारण नहीं | आपत्तीयां यों ही उपस्थित नहीं होती | वे तो परमात्मा की कृपा सूचित करती है | संकटों द्वारा कसौटी पर कसने की कृपा सूचित करती है | संकटों द्वारा कसोटी पर कसने और उसमें सफल होने पर आगे का उन्नत मार्ग हमें दिखाने की ईश्वरी इच्छा ही उस से जाहीर होती है | डॉ. हेडगेवार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा