२२ गौरवशाली भूतकाळ
१
१
काही लोक आधुनिकतेच्या बेटावर राहतात . भूतकाळ हा दिवाळखोरीचा असून त्यातून घेण्याजोगे काही नाही अशी त्यांची समजूत असते . आघाडीवर पराक्रम करणारे सैनिक पिछाडीवरील शिदोरीच्या आधारावरच लढत असतात यावर त्यांचा विश्वास नसतो . त्यांना हे आवर्जून सांगितले पाहिजे की जेव्हा एखाद्या समाजाला त्यांच्या विचारांची बीजे त्या समाजाच्या समृध्द परंपरेत सापडतात तेव्हाच त्या समाजाच्या गौरवशाली पुनरुत्थानाच्या कालखंडाला प्रारंभ होतो .
ज्या दुर्दैवी लोकांनी आपली समृद्ध परंपरा हरवली आहे, त्यांनी वर्तमानकाळही गमावला आहे . समृद्धतेचे बीजारोपण करण्याची जमीन त्यांच्यापासून दुरावली असून आपले पोट भरण्यासाठी ते दारोदार भटकत आहेत . जगातील अशा लोकांमध्ये आम्हीही एक आहोत असा गैरसमज आपण करून घेत कामा नये .
- रविंद्रनाथ टागोर
ज्या दुर्दैवी लोकांनी आपली समृद्ध परंपरा हरवली आहे, त्यांनी वर्तमानकाळही गमावला आहे . समृद्धतेचे बीजारोपण करण्याची जमीन त्यांच्यापासून दुरावली असून आपले पोट भरण्यासाठी ते दारोदार भटकत आहेत . जगातील अशा लोकांमध्ये आम्हीही एक आहोत असा गैरसमज आपण करून घेत कामा नये .
- रविंद्रनाथ टागोर
२
भूतकाळातून भविष्याचे निर्माण होते म्हणून जितके मागे पाहता येईल तितके मागे पहा. तुमच्या मागे जो अनंत जीवन प्रवाह आहे, त्याचे येथेच्छ प्राशन करा आणि पुढे पहा. पुढे चला आणि भारताला पहिल्यापेक्षा अधिक उन्नत करा. आपले पूर्वज महान होते याचे प्रथम स्मरण करा. आम्ही प्रथम त्या तत्त्वांना समजले पाहिजे ज्यामुळे आम्ही बनलो आहोत. त्या रक्ताला समजले पाहिजे की जे आमच्या नसानसातून वाहत आहे. आम्हाला त्या रक्तावर व त्या रक्ताने भूतकाळात जे केले त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. भूतकालातील ती श्रेष्ठता व चेतना, त्यासंबंधी आमची आस्था या भरवशावर आम्हाला पहिल्यापेक्षा अधिक भव्य व अधिक दिव्य भारत निर्माण करायचा आहे.
- स्वामी विवेकानंद
३
आम्ही अस्सल भारतीय रहावे; युरोपीय बनू नये, ही ईश्वराची इच्छा आहे ! परंतु आम्ही आमच्या सत्तेहून भिन्न अशा अन्य कोणाच्या सत्तेच्या नियमांचे पालन करून जीवनाच्या पुनर्प्राप्तीची धडपड केली आहे. आता आम्हास येथून परत फिरले पाहिजे आणि जीवन व शक्तीचे मूल स्त्रोत आपल्यातच शोधले पाहिजेत. आपल्या अतित कालाचे ज्ञान आपणा स्वतःच प्राप्त करून घ्यावयाचे आहे; आणि आपल्या भवितव्यासाठी त्याचा पुन: उपयोग करावयाचा आहे. ऋषी अरविंद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा