१६ . वनवासी कल्याण
१
वनवासी भागात, गिरीकंदरात राहणाऱ्या आपल्या बांधवांजवळ जाऊन त्यांचे जीवन सुधारण्यासाठी त्यांना सुशिक्षित करणे, त्यांना निरनिराळी साधने उपलब्ध करून देणे, त्यांचे ऐहिक जीवन अधिक सुखी होण्यासाठी आवश्यक व्यवस्था करणे आणि त्याचबरोबर त्यांच्या अतःकरणात परमेश्वराच्या शुद्ध भक्तीच्या आधारावर हिंदू धर्माचा अभिमान जागृत करून एकात्मतेचा बोध निर्माण करणे यासाठी आपण प्रत्यक्ष परिश्रम करण्याची आवश्यकता आहे . दुसरा कोणी करील असे म्हणून चालणार नाही . - पू . श्रीगुरुजी

२
आपल्या देशात जिथे कामाची अत्यंत आवश्यकता आहे असे क्षेत्र वनवासिंचेच व दुसरे दलित बंधूंचे आहे. परंतु या दोन्ही क्षेत्रात जे लोक काम करीत आहेत, त्यांच्या कामाचे स्वरूप आंदोलनात्मक आहे. आपल्या मागण्यांना आंदोलनाचे स्वरूप देऊन समस्या अधिक बिकट करणे हीच त्यांच्या कामाची पद्धत झाली आहे. शेवटी समस्यांची सोडवणूक विधायक पद्धतीनेच होईल हे आम्ही विसरता कामा नये. त्यासाठी त्या समाजातील लोकांमध्ये मिसळून निरनिराळ्या रचनात्मक योजना तयार करून त्यांच्या समस्या सोडविण्याचे उपाय सांगण्याची आवश्यकता आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा