२४ जीवनमूल्ये
१
ज्या जीवनमूल्यासाठी भारत सदैव झगडतो आहे ती जीवनमूल्ये केवळ भारताची नसून अवघ्या विश्वाची आहेत . आम्ही आधुनिकतेतील सामर्थ्य आणि प्राचीनतेतील संतोष यांचा समन्वय साधू इच्छितो . विज्ञानाच्या जोरावर जगातील उन्नतीशील देश अधिकाधिक शक्तीशाली बनत आहेत . परंतु जसजशी त्यांची परंपरा आणि शक्ती वाढते आहे तसतशी त्यांचे समाधान आणि शांतता यांचा लोप होतो आहे . विज्ञानास आत्मसात करूनही त्यांचे दास मात्र बनणार नाहीत असाच मार्ग आम्हांस भारतात शोधायचा आहे . आमचे ऐश्वर्य आणि शक्ती अवश्य वाढावी पण संपत्तीसाठी वेडे होऊन भरकटत जाणे कधीच घडू नये .
- राष्ट्रकवि रामधारीसिंह दिनकर

२
मानवीय
जीवनाला मौल्यवान बनवण्याची क्षमता ज्या गुणांमध्ये असते त्या गुणांना जीवनमूल्य
म्हणतात . त्यांना भगवद्गीतेमध्ये दैवी संपदा असे म्हटले गेले आहे. प्रगतीशील
व्यक्ती व राष्ट्र यांच्याही याच कसोट्या आहेत. हि मुल्ये शाश्वत आहेत आणि मानवते
बरोबरच निर्माण झालेली आहेत.
- श्री. प्र. ग. सहस्रबुद्धे
३
संसारिक सुख सोयींना सोडून निस्वार्थी भावनेने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचे प्रचंड संघटन अध्यात्मिक जीवनमूल्यांची वैचारिक बैठक असल्याखेरीज निर्माण होऊ शकत नाही. त्यांच्या आधारावरच भोगवादाला परास्त करून अध्यात्मिक विचारांची विजय पताका फडकवणे शक्य आहे. आपल्या पुरुषार्थाच्या आधारावरच आपले हिंदुराष्ट्र आम्ही सामर्थ्यवान बनवू. अशी हिंदू नवयुवकांमध्ये महत्त्वाकांक्षा निर्माण करण्याच्या कार्यासच संघ लागला आहे. आणि त्याच्या आधारावरच प्रथम भारतामधून व नंतर साऱ्या जगामधून भोगवादाचे झेंडे उखडून टाकू.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा