बुधवार, २२ जून, २०१६

२६ . स्वातंत्र्य

                               २६ स्वातंत्र्य  

      
            कोणतेही गुलाम राष्ट्र क्रमशः उन्नती करीत स्वातंत्र्य प्राप्तीच्या मार्गावर अग्रेसर होत नसते. प्रथम स्वातंत्र्यप्राप्ती करून ते उन्नतीचे सर्व मार्ग मोकळे करते. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी समाजात राष्ट्रीयत्वाची प्रखर भावना आणि स्वातंत्र्याची आकांक्षा हि केवळ एकच उन्नती आवश्यक आहे. त्यामुळे स्वातंत्र्यासाठी मार्गक्रमण करीत असता आवश्यक त्यावेळी बलिदानाचीही प्रेरणा निर्माण होऊ शकेल.                          - पू . श्रीगुरुजी 

       स्वातंत्र्यासाठी इंग्रजांच्या बुटांना पॉलिश करण्यापासून, तो तेच बूट पायातून काढून त्यांचे डोके रक्तबंबाळ करीत मारण्यापर्यंत सर्व मार्ग माझी स्वातंत्र्यप्राप्तीची साधने होऊ शकतात. कोणत्याही मार्गाविषयी माझ्या मनात तिरस्काराचा भाव नाही . इंग्रजांना बाहेर हाकलून देश स्वतंत्र करणे एवढेच मला ठाऊक आहे.                                                 - पू. डॉ. हेडगेवार

         क्या आप खिले हुए गुलाब की सुगंध चाहते है । यदि हां,  तो आपको काटे भी स्वीकार करने पडेंगे । यदि आप मुस्काते उषः काल की मधुरिमा चाहते है, तो आपको अंधेरी रात के कराल घंटों को बीताना पडेगा । यदि मुक्ती के आनंद और स्वतंत्रता का समाधान चाहते, तो उसकी किंमत चुकानी पडेगी और स्वतंत्रता की किंमत है, कष्ट सहन करना ।                                                                                            - नेताजी सुभाषचंद्र बोस 

४  
          अनुदारतेचा दोष दिला गेला तरीही सर्वप्रथम विदेशी दास्यतेच्याअवशेषांना समूळ उखडून फेकून दिले पाहिजे. यातूनच प्रखर राष्ट्रभक्ती निर्माण होईल आणि विश्वातील विभिन्न देशांमधील समाजांसमोर निर्भयतेने व निःशंक होऊन सामोरे जाण्याची स्वाभिमानी दृष्टी प्राप्त होईल.                             - पू . श्रीगुरुजी

           एखाद्या विशिष्ट जीवनदर्शनावर विश्वास म्हणजे वैचारिक स्वातंत्र्याला विरोध नव्हे. स्वातंत्र्य म्हणजे काहीही करण्यास मोकळीक नव्हे. बौद्धिक स्वतंत्रतेच्या नावावर चालणाऱ्या स्वैर व उच्छंखल व्यवहाराचे कोणीही स्वागत करीत नाही. जंगलाचेही काही नियम बंधने असतातच. मानवता जिवंत राहायची असेल तर आपल्या आजपर्यंतच्या अनुभवातून भविष्याचा वेध घेऊन त्याच्या आधारावरच व्यक्तिगत व सामूहिक व्यवहारासाठी काही नीती-नियम निश्चित करावेच लागतील.                                                                        डॉ . संपूर्णानंद


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा