१
बुधवार, २२ जून, २०१६
१४ . लोकशाही
१
१३ . कार्यकर्ता
१
कोणताही समाज सामर्थ्य संपन्न व्हावा व ते सामर्थ्य कायम रहावे यासाठी समाजात समाजहितदक्ष, प्रामाणिक, समाजासाठी कोणतेही कार्य करण्याची तयारी असलेले सदैव तत्पर, कर्तव्यदक्ष आणि त्यागी कार्यकर्त्यांची उज्ज्वल परंपरा निर्माण होण्याची आवश्यकता आहे . आणि ही परिस्थिती चिरकाल राहावी याकरिता अशी मूलगामी परिस्थिती निर्माण करणारा निरपेक्ष पवित्र स्त्रोत निर्माण करण्याचे कार्य संघाने स्वीकारले आहे .
- भय्याजी दाणी
१५. शासन- सरकार
१
हे हिंदुराष्ट्र सनातन आहे . पूर्वी होते, आजही आहे आणि पुढेही राहील . आम्हाला जर अशी स्थिती हवी असेल तर हे राष्ट्र व त्याचे समाजजीवन शासन निरपेक्ष व स्वायत्त म्हणजे स्वयंशासित असले पाहिजे . त्याच्या अनेक साधनांपैकी एक साधन म्हणजे शासन . यापेक्षा त्याचे अधिक महत्व नाही .
११ अखंड भारत
१
१७ . हिंदू धर्म
१७ . हिंदू धर्म
१
१२९ हिंदुस्थान
१
हिंदुस्थान म्हणजे हिंदूंचे स्थान. आपली भूमी आणि तीवर राहणारा समाज यांनी मिळून बनलेले हे नाव आहे. या जनसमुदायास ' भारतीय राष्ट्र ' असेही म्हणतात.
१८ . संघर्ष
१
- नेताजी सुभाषचंद्र बोस
१६ . वनवासी कल्याण
१
वनवासी भागात, गिरीकंदरात राहणाऱ्या आपल्या बांधवांजवळ जाऊन त्यांचे जीवन सुधारण्यासाठी त्यांना सुशिक्षित करणे, त्यांना निरनिराळी साधने उपलब्ध करून देणे, त्यांचे ऐहिक जीवन अधिक सुखी होण्यासाठी आवश्यक व्यवस्था करणे आणि त्याचबरोबर त्यांच्या अतःकरणात परमेश्वराच्या शुद्ध भक्तीच्या आधारावर हिंदू धर्माचा अभिमान जागृत करून एकात्मतेचा बोध निर्माण करणे यासाठी आपण प्रत्यक्ष परिश्रम करण्याची आवश्यकता आहे . दुसरा कोणी करील असे म्हणून चालणार नाही . - पू . श्रीगुरुजी
१९ . प. पू . श्रीगुरुजी
१
देश व समाजसेवेपुढे प्रत्यक्ष ईश्वरप्राप्तीचा व अन्य सर्व मोह व लाभ अत्यंत गौण आहेत हे पू . श्रीगुरुजींच्या जीवनचरित्रापासून स्वयंसेवक व अन्य लोकांनी शिकले पाहिजे . अंगीकृत कार्य आपल्या संपूर्ण शक्तीनिशी शेवटच्या क्षणापर्यंत करीत राहणे, कार्यानुकुल आपल्या व्यक्तिगत व पारिवारिक जीवनाची रचना करणे, आपल्या स्वभावात आवश्यक ते परिवर्तन करणे व कार्य सफल करणे हा आदर्श प . पू . श्रीगुरुजींच्या जीवनचरित्राने आपल्या समोर ठेवला आहे . - आप्पाजी जोशी
“तुम्ही निर्दोष,
निःस्वार्थ आणि निर्भय
माणसाचे जीवन चरित्र पाहत आहात, जे केवळ स्वतःसाठी नाही तर सर्वांसाठी पूर्णपणे जगले. जगात
किती लोकांविषयी असे म्हणता येईल? याहूनही महत्तम सांगायचे झाल्यास, श्री गोळवलकर गुरुजींनी
भारत आणि तेथील जनतेसाठी केलेली सेवा म्हणजे, त्यांनी नेहमीच स्वतःच्या वाणी व
कृतीतून त्या विशेष मूल्यांचे जतन केले, जी मुल्ये राष्ट्राच्या अस्तित्वासाठी आणि
सुव्यवस्थित विकासासाठी आवश्यक आहेत. रामकृष्ण आश्रमाचे पत्र
२१. व्यायाम
१
' शारीरिक श्रम आणि खेळ या गोष्टी केवळ तरुणांसाठीच असतात ' अशी चुकीची धारणा काही लोकांच्या मनात घर करून बसली आहे . अशीच आणखी एक समस्या आहे . ' शारीरिक श्रम आणि उच्च जीवनस्तर या दोन परस्परविरोधी गोष्टी आहेत .' असा कोणी भूताने लोकांना कानमंत्र दिला आहे ! खरे तर शारीरिक श्रम आणि व्यायाम याद्वारे प्रत्येकाने आपणांस अत्यंत निरोगी नि उत्साही राखावयास पाहिजे . मन उत्साही असेल तरच शरीर स्फूर्तीशाली राहते; आणि शरीर स्फूर्तीने भरलेले असेल तर मन उत्साहाने पूर्ण राहते .
- श्री . सुब्रह्मण्य भारती
२० . पंथ समादर
१
धर्मनिरपेक्षतेच्या चुकीच्या व्याख्येने आम्ही आपल्या नवयुवकांच्या पिढीला आपल्या गतकाळापासून वंचित केले असून भविष्याविषयी काहीच मार्गदर्शन केलेले नाही . ज्या कार्यास ते हातभार लावू शकतील अशी नवीन विश्वाची कसलीच कल्पना आम्ही त्यांच्या समोर उभी केलेली नाही . अशा लोकांना अथवा मानवजातीलाही देता येईल असा काही संदेश आपणाजवळ नाही .
- डॉ . संपूर्णानंद
२५ . समाज शिल्पी
१
जगाची नवीन जडणघडण करू पाहणारे वा नवसमाज निर्मू इच्छिणारे महापुरुष कधीही समाजाच्या पारंपारिक चाकोरीत बांधले जात नसतात . त्यांचे मनोधैर्य प्रबळ असल्यामुळे ते कालविरोधी जुनाट चालीरीती, परंपरा, रूढी नि निर्बंध यात अडकून पडत नाहीत. ते परंपरेला कालसुसंगत रूप देतात . अज्ञानी लोक मात्र रुढीच्या दास्यात राहतात . सामान्य जनता तिच्या आज्ञेत राहते . परंतु , जीवित ध्येयाने धुंद झालेले कर्मवीर आपल्या प्रतिभेनुरुप समाज निर्मिती करतात .
- धनंजय कीर
२६ . स्वातंत्र्य
१
२४ जीवनमूल्ये
१
ज्या जीवनमूल्यासाठी भारत सदैव झगडतो आहे ती जीवनमूल्ये केवळ भारताची नसून अवघ्या विश्वाची आहेत . आम्ही आधुनिकतेतील सामर्थ्य आणि प्राचीनतेतील संतोष यांचा समन्वय साधू इच्छितो . विज्ञानाच्या जोरावर जगातील उन्नतीशील देश अधिकाधिक शक्तीशाली बनत आहेत . परंतु जसजशी त्यांची परंपरा आणि शक्ती वाढते आहे तसतशी त्यांचे समाधान आणि शांतता यांचा लोप होतो आहे . विज्ञानास आत्मसात करूनही त्यांचे दास मात्र बनणार नाहीत असाच मार्ग आम्हांस भारतात शोधायचा आहे . आमचे ऐश्वर्य आणि शक्ती अवश्य वाढावी पण संपत्तीसाठी वेडे होऊन भरकटत जाणे कधीच घडू नये .
- राष्ट्रकवि रामधारीसिंह दिनकर
२३ . स्वदेशी
१
एक वेळ आमची सत्ता हिंदी लोकांना देऊ पण व्यापार त्यांच्या हातात देणार नाही या ब्रिटीशांच्या नीतीकडे आजपर्यंत आमची नजर गेली नव्हती . स्वदेशाचा शत्रू आणि स्वदेशीचा शत्रू यात काही भेद नाही . देशाची उन्नती किंवा अभ्युदय स्वपराक्रमानेच प्राप्त करून घेण्यास आपण झटले पाहिजे .
- लोकमान्य टिळक
२
“ब्रिटिशांचा ताबा आणि त्यातून
निर्माण झालेल्या वसाहतवादी मानसिकतेने भारताला त्याच्या आत्म्यापासून वेगळे
करण्याचे अनेक प्रभावी प्रयत्न केले. पण ही भारतीय मनाची ही उपजत ऊर्जा आहे की हे
प्रयत्न पूर्णपणे यशस्वी होऊ शकले नाहीत.आजही स्वदेशी मूल्यांच्या आधारावर देश
घडवण्याचे यशस्वी प्रयत्न सुरू आहेत.”
३३ . हिंदुत्व
१
- दत्तोपंत ठेंगडी
२२ गौरवशाली भूतकाळ
१
ज्या दुर्दैवी लोकांनी आपली समृद्ध परंपरा हरवली आहे, त्यांनी वर्तमानकाळही गमावला आहे . समृद्धतेचे बीजारोपण करण्याची जमीन त्यांच्यापासून दुरावली असून आपले पोट भरण्यासाठी ते दारोदार भटकत आहेत . जगातील अशा लोकांमध्ये आम्हीही एक आहोत असा गैरसमज आपण करून घेत कामा नये .
- रविंद्रनाथ टागोर
२७. विविधतेत एकता
१
ज्याप्रमाणे एक रेशमाचा धागा निरनिराळ्या रंगीबेरंगी हिऱ्यांचा एक सुंदर हार गुंफतो. त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या विविधतेतसुद्धा एक एकत्वाचा धागा असल्याचे अभ्यासपूर्ण निरीक्षण केल्यास लक्षात येते . यातील कोणताही हिरा वेगळा नाही . आपल्या स्वतःच्या सौंदर्याने तो केवळ मोहित करत नसून अन्य हिऱ्यांच्या सौंदर्यातही भर टाकीत असतो . ही काही कोरी कविकल्पना नसून एक पूर्ण प्रस्थापित सत्य आहे .
- डॉ . राजेन्द्रप्रसाद
३१ . ध्येय पथिक
१
२९ . राष्ट्रीयता
१
- लक्ष्मणराव इनामदार
२८ . गुण संवर्धन
जो समाज आपल्या सर्वांगीण उत्कर्षासाठी आवश्यक गुणांचे संवर्धन करतो आणि त्या उज्ज्वल गुणांची एक परंपरा निर्माण करून अशी एक व्यवस्था उत्पन्न करतो की, ज्यामुळे एका पिढीतून दुसर्या पिढीत त्या गुणांचा विकास होत जावा, तोच समाज आपले जीवन सार्थकी लावून या जगामध्ये एक सुस्थिर व संरक्षित समाज या नात्याने चिरंतन राहतो . अशा गुणांच्या सतत संवर्धनाने तो विशाल होत जातो व विशाल होत असतानाच त्याची विजीगीषाही वाढत जाते .
- भय्याजी दाणी
३५ कर्मयोगी
आम्ही गौरवास्पद भूतकाळालाच राष्ट्रजीवनाचा परमोच्च बिंदू मानीत नाही . वर्तमानकाळाकडे आम्ही वास्तववादी दृष्टीतून पाहतो . पण त्याचेशी स्वतःलाच जखडून घेत नाही . आमच्या दृष्टीसमोर वैभवशाली भविष्याचे ' सोनेरी स्वप्न ' आहे . पण आम्ही स्वप्नाळू नाही तर त्या भविष्याला साकार करणारे जागृत कर्मयोगी आहोत . अनादी भूतकाळ, अस्थिर वर्तमानकाळ व अनंत भविष्यकाळ यांचेवर विजय मिळविणाऱ्या कालजयी हिंदू संस्कृतीचे आम्ही पुजारी आहोत .
- पं . दीनदयाळ उपाध्याय
१३० आस्था
जेव्हा मी हिंदुंमध्ये आस्था कमी आहे अशी तक्रार करतो त्यावेळी माझा हेतू ( अर्थ - अभिप्राय ) व्यक्तिगत असत नाही तर सामाजिक आस्था जी विजयाची जनक ( निर्माती ) आहे, ती आस्था कि जी समुदायाला जागृत करून उभी करते . आपली निर्यात, आपले जीवनहेतू ( ध्येय ), आपल्या महाकाव्यातील ध्येयासंबंधी आस्था, संघर्षासाठी सिद्ध असणारी आस्था,आपल्या हृदयात आपला धर्म आणि भावी प्रगती हे ध्येय ठेवून परमात्मा आणि मानवी कल्याणाचा मार्ग निःशंक व निर्भय होऊन पुढे जाण्यासाठी प्रेरणा देणारी आस्था तीच ही आस्था आहे की जी आज आपल्या राष्ट्रास सुदृढ करण्यासाठी नितांत आवश्यक आहे . - लाला लजपतराय