बुधवार, २८ ऑगस्ट, २०१९

३४ रा . स्व . संघ

 ३४  रा . स्व . संघ 


            मनुने एका मासळीचा जीव वाचविला व त्याला वाढविले . पुढे हा मासा एवढा वाढला, मोठा झाला कि प्रलयकाळी त्याने मनुच्या नौकेचे रक्षण केले .त्यामुळे सर्व जीवसृष्टी नष्ट होण्याचा धोका टळला .राष्ट्रीय स्वयंसेवक संघही त्या माशाप्रमाणे भारतीय संस्कृतीच्या बीजाचे रक्षण करून संपूर्ण विश्वात या संस्कृतीचा भव्य, तेजस्वी अविष्कार घडवून आणेल, याच दृष्टीने आपण संघाकडे पाहिले पाहिजे .                                                                                      - प. पू . श्रीगुरुजी
          संघाच्या महान जीवनकार्यावर आपली अढळ निष्ठा असू द्या. संघाचे ध्येय हृदयावर कोरून ठेवा. अखिल हिंदू समाजात आपल्याला नवचैतन्य आणि निर्भयता उत्पन्न करावयाची आहे. सामाजिक बल  उत्पन्न करून समाजघटकांत स्वाभिमान आणि आत्मविश्वास जागवावयाचा आहे.                                                                                                - पू . डॉक्टर 
      राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदू समाजाचे राष्ट्रीय स्वरूप ओळखून प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात ज्वलंत भारत भक्ती जागविण्याचेराष्ट्रसेवेसाठी सर्वस्वार्पण युक्तशील चारित्र्य संपन्न जीवन स्वीकारण्याचे तसेच त्यादृष्टीने एकरस एकात्म समाज जीवन असेतु हिमालय पुन्हा प्रतिष्ठापित करण्याचा निश्चय पूर्वक प्रयत्न करीत असतो.                                - प. पू . श्रीगुरुजी

        आजकाल आपली फार स्तुती होत आहे. पण त्यामुळे हुरळून जाऊन आपण फार मोठे काम केले असे समजू नका. व्यक्तीशः असा अभिमान तर वाईटच आहे, पण संघशः तसा अभिमान धरणेही योग्य नाही. कारण लोक स्तुती करतात म्हणजे त्यांना हे काम आवडते इतकाच त्याचा अर्थ समजावा व स्तुतीने हुरळून न जाता आपले कार्य अधिक जोमाने करू लागावे. प्रशंसेमुळे मनाला आनंद होतो हे खरे आहे, पण त्याबरोबरच आपली जबाबदारीही वाढते हे विसरून चालणार नाही. 

५ 
     हिंदुराष्ट्राच्या परमवैभवाचे साधन असलेल्या धर्माचे संरक्षण आणि त्यासाठी हिंदूंची विजयशालिनी संघटित कार्यशक्ती म्हणजेच या संपूर्ण हिंदू समाजाची सुसंघटीत तसेच अनुशासीत व्यवस्थेला आधार देणे हेच संघकार्य आहे.

६ 
          कोणताही समाज सामर्थ्य संपन्न व्हावा व ते सामर्थ्य कायम रहावे यासाठी समाजात समाजहितदक्ष, प्रामाणिक, समाजासाठी कोणतेही कार्य करण्याची तयारी असलेले सदैव तत्पर, कर्तव्यदक्ष आणि त्यागी कार्यकर्त्यांची उज्ज्वल परंपरा निर्माण होण्याची आवश्यकता आहे . आणि ही परिस्थिती चिरकाल राहावी याकरिता अशी मूलगामी परिस्थिती निर्माण करणारा निरपेक्ष पवित्र स्त्रोत निर्माण करण्याचे कार्य संघाने स्वीकारले आहे .
                                 - भय्याजी  दाणी
       राष्ट्राचा कलंक दूर करून त्याला महान करण्यासाठी मूठभर लोकांचे प्रयत्न पुरेसे नाहीत. मूठभर लोकांनी तर राजस्थान, पंजाब, महाराष्ट्र या प्रांतात बलिदान केले आणि जनसामान्यांनी सर्वसाधारण त्यांना भगवान मानून त्यांच्या तसबिरी लावून पूजा, आरती करू लागले. असं निष्क्रिय कर्म करून देशाचे दुःख, दैन्य दूर होत नसते म्हणून डॉक्टर हेडगेवारांनी देश कल्याणसाठी आवश्यक गुणानी युक्त अशा कार्यकर्त्यांची मोठी संख्या उभी करून संपूर्ण समाजाला गुणसंपन्न करण्याचा निश्चय केला. त्यातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ निर्माण (स्थापन) झाला.

      संघकार्य परिस्थिती निरपेक्ष आहे असे आपले प. पू. डॉक्टरसाहेब म्हणत असत. असे म्हणण्याचे कारण असे की कोणत्याही समाजाला समर्थ करण्यासाठी व ते सामर्थ्य टिकविण्यासाठी समाजामध्ये समाजहितेच्छु, प्रामाणिक कष्ट करण्यास सदैव तत्पर, उद्योगशील, कर्तव्यदक्ष तसेच त्यागी कार्यकर्त्यांच्या उज्वल परंपरेची आवश्यकता असते व हे कार्य सातत्याने चालू राहावे लागते, याच मूलगामी, परिस्थिती निरपेक्ष पावन प्रवाहाचे कार्य संघाने अंगिकारले आहे. -            भैय्याजी दाणी

       हिंदू संस्कृतीचा विध्वंस करून हिंदू लोकांना कायमचे पारतंत्र्यात डांबून टाकण्याच्या उद्देशाने जे जे परधर्मीय लोक हिंदुस्थानात आले असतील व आज राहत असतील त्यांच्या त्यांच्या उद्दाम आक्रमणापासून हिंदू समाजाचे रक्षण करणे व हे करत असताना पडतील ते कष्ट सहन करण्याची, येतील ती संकटे भोगण्याची, इतकेच नव्हे तर ! सदैव देहत्यागासही तयार राहण्याची मनोवृत्ती सर्व हिंदू समाजात उत्पन्न करून त्यांची संघटना करणे हे कार्य संघाला करावयाचे आहे.

१०
       जर आपल्या हिंदुस्तानाच्या कल्याणार्थ कोणत्याही कल्पना या संघटनेच्या मनात आल्या तर त्या कृतीत उतरविताना आपली संघटना कोती आहे, दुर्बल आहे, म्हणून ती काही करू शकत नाही, असे म्हणण्याची पाळी येऊ देणार नाही. एवढीच पवित्र, स्वाभिमानी, उज्वल व तेजस्वी भावना ह्रदयाशी बाळगून ही संघटना जास्तीत जास्त प्रबल व प्रभावी कशी होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. आपल्या ऐहिक जगात आपल्या हिंदू राष्ट्राकरिता स्वाभिमानाने व उजळ माथ्याने जगण्याकरिता जे जे काही करावे लागेल तेथे करण्याचे या संघटनेने ठरविलेले आहे. हे कार्य किती मोठे आहे व याकरिता किती झटले पाहिजे हे मी सांगावयास नको. सुज्ञ, विचारी व बुद्धिप्रधान हिंदू तरुण या कार्यार्थ स्वतःला वाहून घेतील असा माझा आत्मविश्वास आहे.                          पू. डॉ. हेडगेवार

११
       आता सर्व ऐषआराम तुच्छ आहेत असा विचार करून, जीवनातील किमान आवश्यकतांचाच केवळ विचार करून, उरलेली सर्व शक्ती संघकार्यार्थ लावावी असा निश्चय करावा. वैयक्तिक जीवनात थोडी गैरव्यवस्था सोसावी लागली तरी संघकार्याची सुव्यवस्था दृढ करण्याचाच आपला संकल्प असला पाहिजे.

१२

  “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वैशिष्टय़ म्हणजे, केवळ ध्येय निश्चित करून समाधानी न होता, त्या ध्येयानुसार आपली कार्यपद्धती विकसित केली.या कार्यपद्धतीबाबत आपण असे म्हणू शकतो की, संपूर्ण हिंदू समाज संघटीत करण्याच्या दृष्टिकोनातून एकच, योग्य आणि परिणामकारक कार्य असेल तर ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कार्यपद्धती आहे, त्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही.”                        मा दत्तोपंत ठेंगडी



                     



३७ शाखा

                                                       ३७  शाखा 
         समाज संघटित करण्यासाठी संघशाखांच्या भक्कम आधारावर निरनिराळ्या क्षेत्रात आपल्या विविध गुणांचा उपयोग करीन हा विचार प्रत्येक स्वयंसेवकाच्या मनात पक्का रुजविणे व त्याला कार्यासाठी उत्साह देणे आवश्यक आहे .                                                       -पू . श्रीगुरुजी
         जर आपल्याला हि जबाबदारी पूर्ण करावयाची असेल तर आपल्या संघशाखेचे स्वरूप उत्कृष्ट असावयास पाहिजे. प्रत्येक ठिकाणी संघाची शाखा हवी आणि त्या संघशाखेवर चांगली उपस्थिती हवी. तिथे चांगले कार्यक्रम व्हावेत आणि संघाच्या संस्कारासाठी योग्य वातावरण हवे. संपूर्ण वायुमंडळ संस्कारयुक्त असावे जेणेकरून शाखेतून संस्कारित झालेले स्वयंसेवक दाही दिशांना जाऊन यशस्वी कार्य करू शकतील आणि समाजाच्या सर्व घटकांचा विश्वास संपादन करू शकतील. 
      डॉक्टर कोरे चिंतक नव्हते त्यांनी व्यक्ती निर्माणासाठी करतात व्यक्तीच्या सुधारण्यासाठी दैनिक शाखा या आगळ्या वेगळ्या पद्धतीचा विकास केला आणि स्वतःच्या उदाहरणाने हजारो अंत: करणामध्ये ' हिंदू संघटन ' या स्वप्नाला साकार करण्याचा संकल्प जागृत केला.           -पू. बाळासाहेब देवरस
      प्रतिदिन सुसंस्कारांची देवाण घेवाण करणे, स्वतः अनुकूल वातावरण निर्माण करून इतर लोकांनाही संस्कार देणे यामधून शाखेचे स्वरूप निश्चित झाले . नेहमी एकत्र राहाणे, स्नेहमय भावनांची हृदयात खोलवर लावणी होईल असे आवाहन, संघटनेच्या दृष्टीने असे नेहमी करीत राहण्याची योजना नित्य चालवणे आवश्यक अशी रचना डॉक्टरांनी केली.                     - पू. श्रीगुरुजी
       आपल्यासमोर एक श्रेष्ठ अत्यंत भव्य दिव्य ध्येय आहे. अत्यंत सुदृढ, संघटित व अनुशासित जीवनाच्या निर्मितीद्वारेच ह्या ध्येयाची प्राप्ती होऊ शकते. व अशा अनुशासनपूर्ण जीवनाची निर्मिती आपल्या दैनंदिन शाखेवरील संस्कार ग्रहण करण्यातूनच होऊ शकते. म्हणून आपल्या पूर्ण शक्तीनिशी संपूर्ण समाजाला दैनंदिन शाखेकडे आकृष्ट करण्यासाठी आपला वेळ देणे, यापेक्षा आपले अन्य कोणतेही श्रेष्ठतर कर्तव्य असू शकत नाही.
       शाखा हे केवळ खेळ खेळण्याचे अथवा कवायत करण्याचे स्थान नाही तर सज्जनांच्या सुरक्षेचे मूक अभिवचन आहे. तरुणांना व्यसनमुक्त ठेवणारे संस्कारपीठ आहे. समाजावर अकस्मात येणाऱ्या संकटात त्वरित व निरपेक्ष मदतीचे आशाकेंद्र आहे. महिलांसाठी निर्भयतेचे व सभ्य आचरणाचे आश्वासन आहे. दुष्ट व राष्ट्रद्रोही शक्तींसाठी धाक निर्माण करणारी शक्ती आहे. आणि सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे-समाजजीवनातील विभिन्न क्षेत्रात सुयोग्य कार्यकर्ते उपलब्ध करून त्यांना प्रशिक्षण देणारे विद्यापीठ आहे.             - बाळासाहेब देवरस   
       जेथे आपल्या महान मातृभूमीचे पुत्र चांगल्या संख्येत एकत्र येऊन खेळतात, आपल्या देवतास्वरूप असलेल्या भारतमातेचे यशोगान गातात. तिचा गौरव वाढावा म्हणून प्रार्थना करतात, अशा आपल्या संघस्थानावरील पवित्र धुळीमध्येच वास्तविक राष्ट्र निर्माणाची सुप्त शक्ती आहे. ' वॉटर्लुचे युद्ध हे इटन व हॅरोच्या मैदानावर जिंकले ' हे ड्यूक ऑफ वेलिग्टनने काढलेले उद्गार ज्या भावनेतून निघाले तीच हि भावना आहे.             पू. श्रीगुरुजी
      समाजामध्ये जे भव्य आणि प्रचंड परिवर्तन संघाला घडवून आणावयाचे आहे ते एका तासाच्या या छोट्या कार्यक्रमातून घडून येणार याचे अनेकांना आश्चर्य वाटते. परंतु यात आश्चर्य करण्यासारखे काही नाही. नेहमीचा अनुभव असा आहे की लोक चालत्या-बोलत्या आदर्शाचेच अनुकरण करतात, केवळ कोरड्या उपदेशाचे नव्हे. संघाच्या दैनंदिन कार्यक्रमांतून असे चालते बोलते आदर्श निर्माण होत असतात. त्यांच्यामध्ये लोकांना आपल्या कार्याकडे आकृष्ट करण्याची असाधारण कर्तृत्वशक्ती निर्माण होते.                                                       मा. स. गोळवलकर
     आपल्या संपूर्ण समाजाला संघटित करायचे आहे तर केवळ आत्मीयतेने ते काम पुरे होणारे नाही. त्याच्या जोडीला आपण व्यक्तिगत अभिमान सोडून, परस्परांना समजावून घेऊन,  सूत्रबद्धतेने साऱ्या समाजाच्या कल्याणासाठी आम्हा सदैव कार्यमग्न राहिले पाहिजे. अर्थातच आपले जीवन समाजाविषयीच्या आत्मीयतेने भरलेले असावे, समाज समर्पित असावे, तसेच ते परस्परांशी सुसंवाद राखणारे, अनुशासनाच्या सूत्रात बांधलेले राहावे, याची खरी आवश्यकता आहे. या आवश्यकतेच्या पूर्ततेसाठी अनुशासनाचे सूत्र आत्मसात करण्यासाठी आम्हास दिनप्रतिदिन त्याचे शिक्षण घेणे अनिवार्य आहे.                                                प. पू. श्री गुरुजी
१०
     दिसायला आपली दैनिक शाखा लहानशी गोष्ट दिसते. परंतु आपल्या २४ तासांच्या जीवनक्रमाची अशी व्यवस्था करायची की, रोज एक तास मी संघाकरिता, समाजाकरिता, देशाकरिता देईन. हा एक मोठा संस्कार आहे. 
या संस्कारामुळे मनाची घडण होते. समाजासंबंधी आत्मीयता निर्माण होते. मनामध्ये सामर्थ्य निर्माण होते व त्यामुळे कोणतीही अवघड कामे करावी लागली तरी ती करण्याची धडाडी स्वयंसेवक दाखवू शकतो. 
प्रत्येक स्वयंसेवकाने निश्चय केला पाहिजे की मी शाखेत रोज जाईनच. मी शाखेत गेलो तर संख्या चांगली राहील, कार्यक्रम चांगले होतील. अन्य स्वयंसेवकांना हुरूप येईल.

११
      भीषण वादळातही आपण अविचल राहिलो. याचे एकमेव कारण म्हणजे आमची दैनंदिन शाखा. म्हणून शाखेचा संख्यात्मक व गुणात्मक विकास कसा होईल याकडे आपले लक्ष असले पाहिजे.

१२
    शाखेत नित्यनियमाने अगदी रोज जे शिक्षण दिले जाते त्यातूनच संपूर्ण समाजाशी एकरूप होण्याचे आणि सुसंघटित कार्यशक्तीचे संस्कार होत असतात. स्वभावाचे कंगोरे, कानेकोपरे घासून टाकण्याची, समाजातील इतर बांधवांशी एकत्वाच्या भावनेने व्यवहार करण्याची, इतरांचे भिन्न दृष्टिकोन समजून घेऊन त्यांच्याशी जुळवून घेण्याची प्रेरणा त्यातूनच मिळत असते. एकाच आज्ञेचे सामूहिकरित्या पालन करण्याचे संस्कार येथे होत असतात. त्यामुळे हळूहळू स्वयंसेवकांच्या रक्तातच अनुशासन भिनते.

१३
     लोक समझते है कि रेडियो पर प्रभावी भाषण आ जाने या समाचार पत्रोंमें छप जाने से उनका मन पर प्रभाव पडता है | परंतु लेखों या भाषणों से मन पर संस्कार नही होते है | यदि मन पर संस्कार करना है तो प्रतिदिन एक पवित्र वायुमंडल में मन को रखने की आवश्यकता हुआ करती है | इस दृष्टी से संघने एक अपनी कार्यपद्धती-दैनंदिन संघशाखा-का विकास किया है |

१४
     संघाच्या कार्यपद्धतीतून राष्ट्रसेवेसाठी संस्कारित व्यक्ती निर्माण होते हा विश्वास संपूर्ण समाजात निर्माण झाला आहे. आमच्या शाखा वाढणे त्यात अधिक संख्या असणे व तेथे होणारे कार्यक्रम अधिक संस्कारक्षम होणे ही आजची फार मोठी गरज आहे. अशा संघशक्तीला समाज सहयोग करण्यास तयार होईल, देश पुन्हा सुख, समृद्ध व सन्मानाचे जीवन जगेल. असा पावन दिवस लवकर उगवावा यासाठी ही सर्वसाधारण चालली आहे.                        प. पू.  राज्जुभैय्या

१५
     हमारी ऐसी धरणा है कि, किसी भी समाज की स्वाभाविक अवस्था संघठन की ही अवस्था होनी चाहिये | संघटन से हमारा मतलब है की समाज के प्रत्येक व्यक्ती के हृदय में समाज के साथ एकात्मता का, समाज के प्रति समर्पण का संस्कार अंकित करना | हर व्यक्ति को यह प्रतीत हो की मैं अलग नहीं, पृथक नहीं, स्वतंत्र नहीं, संपूर्ण समाज का अवयव मात्र हूं, समाज के सुख में मेरा सुख, समाज के दुख में मेरा दुःख, समाज के सम्मान में मेरा सम्मान और समाज के अपमान में मेरा अपमान है | यह संस्कार हर व्यक्ती के हृदय पर अंकित करने के लिए ऐसा संस्कार अंकित करने वाली दिन-प्रतिदिन एकत्रिकरण की कार्यपद्धती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अपनाई है |

१६
    भगवान श्रीकृष्ण यांनी प्राचीन काळात ईश्वर-साक्षात्कार करण्याचा अत्यंत सोपा, आचरण करण्यास सरळ व योग्य असा मार्ग मानवाला दाखविला. आजच्या काळात परमेश्वर-प्राप्तीचा सुगम व सोपा मार्ग स्वामी रामकृष्णांनी दाखविला. तर आजच्या युगात राष्ट्रस्वरूप परमेश्वराशी तादात्म्य होण्याचा अति सोपा व सरळ मार्ग डॉक्टरजींनी दाखविला. हा मार्ग सोपा व सरळ असून, राष्ट्र अमर करणारा आहे.

१७
    संघ प्रत्येक लढाई जिंकत आहे, अनेक कामे पार पाडीत आहे. याचे संपूर्ण श्रेय दैनंदिन शाखेला आहे. प्रतिदिन सतत कार्य करणे, कार्य करीत असताना आपल्या मनावर दृढ संस्कार करीत राहणे, ते मंद किंवा दुर्बल होऊ न देणे आणि आपल्या समाजाला एकमेकांच्या निकट सहवासातून उत्पन्न झालेल्या नित्यसिद्ध शक्तीनिशी उभे करणे आवश्यक आहे. आपली दैनंदिन शाखा व तिचे कार्यक्रम यांचा हा सुस्पष्ट हेतू आहे.

१८
    संघाचा स्वयंसेवक हा इतर संघटनांतील सेवकांसारखा नसतो, तर तो एक चारित्र्यसंपन्न, लोकसंग्रही, राष्ट्रसमर्पित व्यक्ती असतो. तो निर्हेतुक प्रेम करणारा आणि आपल्या व्यवहाराने लोकांची मनी जिंकणारा असतो. अशा व्यक्ती निर्माण करणे हे शाखेचे काम आहे.

१९
      संघस्थान हे संस्कार स्थान आहे, तेथे आपण जे संस्कार ग्रहण करतो त्या संस्कारांना अनुकूल असा आपला व्यवहारही असला पाहिजे. संघाच्या स्वयंसेवकांचा वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक व्यवहार संस्कारानुकूल आहे की नाही हे बाहेरील लोक बारकाईने पाहतील.

२०
     हमें ध्यान में रखना चाहिए की शाखा के बिना हम भिन्न-भिन्न कार्य नही कर पायेंगे | जहां अपनी शाखा अच्छी चलती है वहां कोई भी कार्य आया तो उसे हम निश्चयपूर्वक सफल कर सकते हैं | अंत: संघ शाखा के कार्यक्रम, उसकी आचारपद्धती, स्वयंसेवक का व्यवहार, स्वयंसेवक का स्वभाव आदी की और हम ध्यान दे और शाखाओं का  प्रसार तथा दृढीकरण करने का एकाग्रचित्त से प्रयत्न करें इतना यदि हम करेंगे तो सब क्षेत्रों में हम लोग विजय प्राप्त करेंगे |           श्री गुरुजी

२१
   संघ केवळ शब्दोंका खेल न होकर एक आचरणीय जीवनपद्धती है तथा मन और तन को उस पद्धती की आदत लगाने के लिए संघ के दिन प्रतिदिन के कार्यक्रम अत्यंत प्रभावी साधन है |                                                डॉ .हेडगेवार
२२
        “दररोज आदर्श मूल्यांची देवाण-घेवाण करणे, स्वतःसाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे आणि इतरांवर संस्कार करणे, यातूनच शाखेचे स्वरूप ठरले.डॉक्टरजींनी दैनंदिन जीवन एकत्रितपणे जगण्यासाठी,प्रेमळ अंतःकरणात भावनांचे खोलवर रोपण होण्यासाठी, दैनंदिन आधारावर,सातत्याने करण्याची एक अभिनव कार्यपद्धती निर्माण केली, जी संगठनेच्या दृष्टिकोनातून उद्देश पुर्तीकरिता आवश्यक आहे.                                                                              श्रीगुरुजी 


११२ नराचा नारायण

                                                           ११२ नराचा नारायण 
         या देशात विभिन्न मतवाद होते. परंतु इतके असूनही आम्ही आपले मूळ तत्व विसरलो नाही. हेच भारताचे वैशिष्ट्य आहे. प्रत्येक व्यक्ती व्यक्तीमध्ये दैवी अंश असल्याची अनुभूती प्राप्त झाली आणि नराचा नारायण होऊ शकतो याबद्दलची खात्री झाली.



     
                                                                               

११३ आधुनिकता

                                       ११३ आधुनिकता 

१ 
             काही लोक आधुनिकतेच्या बेटावर राहतात . भूतकाळ हा दिवाळखोरीचा असून त्यातून घेण्याजोगे काही नाही अशी त्यांची समजूत असते . आघाडीवर पराक्रम करणारे सैनिक पिछाडीवरील शिदोरीच्या आधारावरच लढत असतात यावर त्यांचा विश्वास नसतो . त्यांना हे आवर्जून सांगितले पाहिजे की जेव्हा एखाद्या समाजाला त्यांच्या विचारांची बीजे त्या समाजाच्या समृध्द परंपरेत सापडतात तेव्हाच त्या समाजाच्या गौरवशाली पुनरुत्थानाच्या कालखंडाला प्रारंभ होतो . 
     ज्या दुर्दैवी लोकांनी आपली समृद्ध परंपरा हरवली आहे, त्यांनी वर्तमानकाळही गमावला आहे . समृद्धतेचे बीजारोपण करण्याची जमीन त्यांच्यापासून दुरावली असून आपले पोट भरण्यासाठी ते दारोदार भटकत आहेत . जगातील अशा लोकांमध्ये आम्हीही एक आहोत असा गैरसमज आपण करून घेत कामा नये .  
                                                                                                             -  रविंद्रनाथ टागोर  

११४ राष्ट्रीय एकात्मता

                             ११४ राष्ट्रीय एकात्मता 

        राष्ट्रीय एकात्मता म्हणजे काय ? जिला आपण अनादिकालापासून मातृभूमी मानत आलो आहोत, तिच्याविषयी ज्वलंत निष्ठा आपण या थोर मातेची लेकरे आहोत या जाणिवेतून निर्माण झालेला स्नेहभाव, भातृभाव. समान संस्कृती व वारसा, समान इतिहास व परंपरा आणि समान आदर्श व आकांक्षा यामधून निर्माण झालेली समान राष्ट्रीय जीवनाची उत्कट जाणीव. अर्थात हिंदू राष्ट्रीयत्व, हाच आपल्या राष्ट्रजीवनाचा भक्कम आधार आहे.     पू. श्री गुरुजी

        जोपर्यंत समाजात आपल्या स्वतःचा अभिमान जागृत होता व त्यामुळे भूमि, धर्म, संस्कृती आणि राष्ट्राची एकात्मतेची भावना विद्यमान होती तोपर्यंत या समाजाकडे डोळे वाकडे करून पाहण्याचे साहस कोणाचे झाले नाही. असा इतिहासातून आपल्याला धडा मिळतो. परंतु एकात्म जीवनाचे विस्मरण झाल्याबरोबर लहान मोठे स्वार्थ आपल्यात घुसले,  सत्तालोभामुळे राज्ये एकमेकांशी भांडू लागली. त्यामुळे आपण निर्बल झालो आणि गुलामी बरोबरच अनेक आपत्तींना आपल्याला तोंड द्यावे लागले.                                                              श्रीगुरुजी

        परस्परांचा द्वेष व तिरस्कार करण्याच्या भावनेमुळेच गेली हजार वर्षे आमच्या राष्ट्रीय जीवनाचे रूपांतर कत्तलखान्यात झाले होते. आजही प्रांत, भाषा, पक्ष, पंथ, संप्रदाय इ. नवीन रूपांमध्ये ही भावना मृत्यूचे तांडव करीत आहे. आजही राष्ट्रीय भावनेच्या त्याच घातक रोगामुळे आमचे शत्रू कोण व मित्र कोण हे ओळखण्याची पात्रताच आम्ही गमावून बसलो आहोत. आजही तसेच सुरू आहे.                                      प. पू.  श्रीगुरुजी

         माझी दृढ श्रद्धा आहे की भारत एक आणि अविभाज्य आहे. राष्ट्रीय एकात्मतेचा आधार आहे. समान मातृभूमी, समान हित आणि समान प्रेम जी शक्ती वेद आणि उपनिषदे यांच्या वचनात, उपासना पंथ आणि साम्राज्ये यांच्या निर्मितीत, विद्वानांच्या विद्वत्तेत आणि संतांच्या चिंतनात प्रकट झाली, तीच शक्ती पुन्हा आमच्यात अवतीर्ण झाली आहे आणि आज तिचे नाव आहे राष्ट्रीयता ! माझा विश्वास आहे की भारताच्या वर्तमान काळाची मुळे त्याच्या भूतकाळात खोलवर रुजलेली आहेत व त्याच्यापुढे एका उज्वल भविष्यकाळाचा प्रकाश पसरू लागला आहे.                                                                                                                      भगिनी निवेदिता
         ज्या असामजिक व असंघटीत किटाणूंच्या प्रादुर्भावामुळे भूतकाळात आमच्या देशाची दुर्दश झाली होती, त्याच रोगाची कीड आजही आमच्या राष्ट्रीय मर्मस्थळांना लागलेली दिसत आहे. त्यामुळे ही शंका नक्कीच आहे, की तोच रोग पुन्हा आमचे स्वातंत्र्य नष्ट तर नाही करणार ?या परिस्थितीत, राष्ट्रीय चेतना आणि सामाजिक एकात्मता पुन्हा जागृत करून एक मजबूत, सुसंघटित राष्ट्रीय जीवन तयार केले पाहिजे.”                      पू.श्रीगुरुजी 
                                                                     

११५ एकता

                                ११५  एकता 
     एकता, एकता, प्रत्येकालाच एकतेची गरज असल्याचे अनुभवास येते . शेकडो व्यक्ती वेगवेगळ्या दिशेने काम करतात तेव्हा त्याचा परिणाम होतो ' शून्य.  '  जोपर्यंत एकाच दिशेने प्रयत्न करणे किंवा एकच ध्येय निश्चित होत नाही, सर्वजण त्या एका विशिष्ट दिशेनेच प्रयत्न करणार नाहीत, तोपर्यंत त्यांच्या उन्नतीची आशा करणे व्यर्थ .  कल्याणामध्येच प्रत्येक व्यक्तीचे हित आहे ही गोष्ट सर्वांत अगोदर आपणांस समजली पाहिजे . 
                                                                                - स्वामी रामतीर्थ 

२ 
         प्रजाती आणि धर्ममते, भाषा आणि भूगोल ही अत्यंत गुंतागुंतीची आणि विभिन्नतामय असून सुद्धा, ज्या शक्तींनी आमच्या समाजास एक राष्ट्र म्हणून उभे केले आणि यापुढेही त्यास ऐक्यसूत्रात चिरस्थायी करू शकतात त्या शक्तींचे स्वरूप आता स्पष्ट होऊ लागले आहे. या शक्ती भौतिक क्षेत्राशी संबंधित नाहीत. आमची एकता भौगोलिक एकता नाही; तिचा संबंध आमच्या विचार-जगताशी आहे. जेव्हा जेव्हा केंद्रीय एकतेचा ऱ्हास झाला तेव्हा आमच्या देशाला त्याची कटू फळे भोगावी लागली. आमच्यातील फुटिरता हीच आमच्या पारतंत्र्यास कारणीभूत होती. म्हणूनच आम्हास भाषा, धर्ममते आणि प्रांतीयतेच्या नावावर फुटीरतेस जन्म देणाऱ्या प्रवृत्तीपासून स्वतःस पूर्ण अलिप्त ठेवावयाचे आहे. 
                                                                                                  - डॉ. राधाकृष्णन

३ 
         हे भारत, अध्यात्मिक ज्ञान और प्रकाश के देश ! जगत में अपने सच्चे कर्तव्य के प्रति सचेतन होवो और एकता तथा सामंजस्य का मार्ग दिखाओ |
                                                                                                - श्री मां
       या राष्ट्राचा गेली १३०० वर्षांचा इतिहास उध्वस्त जीवनाचे दृश्य प्रकट करीत आहे. हे जीवन उध्वस्त का झाले ? यासंबंधी इतिहास काय मार्गदर्शन करतो ? इतिहासाचे याबाबत स्पष्ट मत आहे की आम्ही आमच्या भौतिक एकतेच्या संस्कारांना आणि श्रद्धांनां विसरलो. त्याचा अनुभव येणे बंद झाले. म्हणून संपूर्ण समाजाला एकसूत्रात राखणारी चेतना बंद झाली. थांबली. समाज छिन्नविछिन्न म्हणजे शक्तिशून्य बनला. अनुशासन संपले आणि अवनतीचे मार्ग उघडे झाले आहेत.            प. पू.  श्रीगुरुजी

     आपल्याला संपूर्ण हिंदू समाजाला संघटित करावयाचे आहे. यासाठी आपण रोज शाखेत एकत्र येतो. भारतमाता ही आपणा सर्वांची मातृभूमी आहे व आपण सर्वजण तिचे पुत्र आहोत. हजारो वर्षांपासून आपण याच भूमीत एकत्र राहत आहोत असे भावनात्मक आवाहन आपण करतो. परंतु हे पुरेसे नाही. याची व्यावहारिक बाजूही आहे. आपण एक आहोत ही भावनात्मक जाणीव जशी असायला पाहिजे. त्याचप्रमाणे व्यवहारातही एकतेचा अनुभव सहजपणे आला पाहिजे. रोजच्या व्यवहारात आपण सर्वजण समान आहोत असे सर्वांना अनुभवाला आल्याखेरीज हा एकतेचा पाया दृढ व चिरस्थायी होणार नाही. त्या दृष्टीने आपल्यात काय कमी आहे व आपण काय केले पाहिजे याचा विचार करणे क्रमप्राप्त आहे.
                                                                              

११६ राष्ट्रहित

                                     ११६  राष्ट्रहित

     आपल्या समाजाकडे मनुष्यबळ होते, धनभांडार होते,  शस्त्रे होती, परंतु मी या राष्ट्राचा घटक आहे म्हणून जीवनात राष्ट्रहिताला अग्रस्थान द्यावयास हवे . आणि जरूर पडल्यास आपले सर्वस्व राष्ट्रहितासाठी समर्पित करावयास हवे याची जाणीव नव्हती . म्हणून सर्व प्रकारे बलशाही असूनही आपला समाज परास्त झाला . म्हणून सर्वात आधी हिंदू समाजामध्ये ही राष्ट्रीय वृत्ती जागृत करून  संघटीत करण्याची आवश्यकता आहे . 
                                                            - लक्ष्मणराव इनामदार  
        शेकडो वर्षांच्या पारतंत्र्यांमुळेच आमच्यात काही विकृती, उच्चनीचतेचे भेद, आर्थिक विषमता, मागासलेपणा, जातिवाद इत्यादी दोष उत्पन्न झाले असावेत. परंतु या दोषांचेच हत्यार परजून कोणी विदेशी शक्ती आमच्या ' स्व ' त्वाचेच अपहरण करून पाहतील तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही. त्यांची ही असुरी आकांक्षा आम्ही धुळीस मिळवू . या आमच्या घरगुती समस्या आहेत. आम्ही त्या परस्पर मिटवून टाकू. व्यक्तिगत लाभासाठी किंवा सामाजिक दृष्टीने अवनत स्थितीतून बाहेर येण्याच्या इच्छेपोटी आम्ही कोणत्याही विदेशियांचे हस्तक बदलणार नाही. आपल्यातूनच उत्पन्न होणाऱ्या ' जयचंदां 'पासून आम्हास अत्यंत सावध राहिले पाहिजे. ज्या राष्ट्राचे तसेच समाजाचे आपण अवयव आहोत त्या समाजाचे हित आपण नीट ओळखले पाहिजे.                   डॉ . बाबासाहेब आंबेडकर
                                                                         

११७ मुसलमान

                                 ११७   मुसलमान 

        आशियातील विशेषतः भारतातील मुसलमानांचे आजचे कर्तव्य काय? अरबस्तानाशी मनाचे नाते जुळवत बसावे हे नाही. हिंदुस्थानशी नाते जुळवणे हे त्यांचे कर्तव्य आहे. हिंदुस्थानच्या राष्ट्रीयत्वाशी नाते जुळवायला हवे. हिंदुस्थानशी तुमचे जे रक्ताचे नाते आहे त्यामुळे किंवा 
येथील लोकांच्या उदार अतःकरणामुळे हा देश तुम्हा सर्वांचं घर झाल आहे त्यासाठी भारताच्या राष्ट्रीय विचाराशी तुमचे नाते जुळले पाहिजे.
                                                                                                              - भगिनी निवेदिता 
    
                                                                                   

११८ पर्यावरण

                                          ११८  पर्यावरण 

१ 
          काली पूजनात हिंदूंची निसर्गशक्तींशी एकरूप होण्याची उत्कटता दिसून येते. पंचमहाभूतांशी तादात्म्य पावण्यासाठी हिंदू मन प्रयत्नशील असते. सर्व सृष्टी एक आहे याची जाणीव कालीपूजनात दिसते.   
                                                                         - भगिनी निवेदिता 
        भारतीय संस्कृती मानव को सब जीव-सृष्टी में श्रेष्ठ तो मानती है, परंतु इस कारण शेष सब जीवों के कल्याण की जिम्मेदारी भी मानव के सिर पर ही उसने रख दी है | भारतीय संस्कृती के अनुसार सारी जीव-सृष्टी भगवान का एक परिवार मात्र है | और क्योंकि समस्त सृष्टी में एक ही आत्म- चैतन्य भरा हुआ है, इसलिए सृष्टी में जो सुख-सुविधाएं है, उन पर सभी जीवों का अधिकार है | बाबासाहेब आपटे
           



                                                                              

११९ संस्कार

                                  ११९  संस्कार 
 १ 
           संघ का संस्कारों पर नितांत विश्वास है | जैसे संस्कार हों वैसीही मनुष्य की वृत्ती बनती है |  और एकही वृत्ती के अनेक लोगों के एकत्रित होने से संघटन के लिये पोषक वातावरण उत्पन्न होता है |  सारे देशभर में इस तरह का पवित्र, श्रद्धायुक्त, ध्येयनिष्ठा के रंग मे रंगा हुआ, निराशा को नष्ट करनेवाला, हिम्मत को बढानेवाला, स्फूर्तीदायक वातावरण तयार करें | स्वयंसेवक जहां भी जायें, वहां यह वातावरण अपने साथ ले जायें |                   प. पू.  डॉ.  हेडगेवार

        संघ संस्थापक प. पू. डॉक्टरांनी भारतीय इतिहासाचा आमुलाग्र अभ्यास केला. जोपर्यंत संत महात्म्याचे प्रयत्नाने जनतेत भव्यता, उज्वलता निर्माण होत होती, समाज राजाश्रित नव्हता व संस्कारीत लोकांच्या आधारे कार्यरत होता तोपर्यंत राष्ट्र सुद्धा भव्य, दिव्य राहिले. परंतु कालांतराने जनतेत क्षुद्र भाव व स्वार्थ निर्माण झाला व त्यामुळे कोट्यावधी जनसंख्या व अतुल पराक्रम असून सुद्धा आपला देश मूठभर आक्रमकांकडून पराभूत झाला. या परिस्थितीत आमुलाग्र बदल करण्याच्या उद्देशाने डॉक्टरांनी संघ कार्याचा प्रारंभ केला.                                             यादवराव जोशी

१२० नीती - नियम

                                १२०  नीती - नियम


            एखाद्या विशिष्ट जीवनदर्शनावर विश्वास म्हणजे वैचारिक स्वातंत्र्याला विरोध नव्हे . स्वातंत्र्य म्हणजे काहीही करण्यास मोकळीक नव्हे . बौद्धिक स्वतंत्रतेच्या नावावर चालणाऱ्या स्वैर व उच्छृन्खल व्यवहाराचे कोणीही स्वागत करत नाही . जंगलाचेही काही नियम असतातच . मानवता जिवंत रहायची असेल तर आपल्या आजपर्यंतच्या अनुभवातून भविष्याचा वेध घेऊन त्याच्या आधारावरच व्यक्तिगत व सामूहिक व्यवहारासाठी काही नीती - नियम निश्चित करावेच लागतील .  

     
                                                                              

१२१ व्यवस्था

                                                            १२१  व्यवस्था 
१ 
           एक सार्वजनिक कार्यकर्ता केवळ व्यवस्थित व अनुशासित असून चालणार नाही तर अव्यवस्था व कमतरता शोधून ती दूर करण्याची त्यांच्यात क्षमता असले पाहिजे. त्यासाठी समतोलबुद्धी असली पाहिजे. त्याला योग्य वेळी योग्य व्यक्तीचा उपयोग करून घेता आला पाहिजे व अव्यवस्था होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. कोणत्याही समूहात, समाजात किंवा राष्ट्रांत अव्यवस्था  निर्माण झाली की त्याचा ऱ्हास होतो.            श्री. एकनाथजी रानडे

        ज्याप्रमाणे एखादा वैद्य शरीरात उत्पन्न झालेल्या विकाराचा शोध घेतो किंवा एखादा यंत्रज्ञ यंत्रात निर्माण झालेला दोष शोधून काढतो त्याप्रमाणे संघटकानेही इतके दक्ष व जागरूक असायला हवे की संघटनेतील दोष तो शोधू शकेल. त्याचे डोळे व कान इतके तयार झालेले असावे की संघटनेतील दोष ताबडतोब त्याच्या ध्यानात यावेत व त्याने ते अविलंब दूर करून संघटना पुन्हा सुव्यवस्थित करावी. परंतु हे कार्य तोच करू शकेल जो स्वतः सुव्यवस्थित आहे. एखादा अव्यस्थित माणूस संघटना उभी करू शकत नाही. त्यातील दोष जाणू शकत नाही किंवा ते दूरही करू शकत नाही.                                                                                               एकनाथजी रानडे

                                                                                                                             

१२२ कृतिशीलता

                                   १२२ कृतिशीलता  
१ 
         ज्याच्या जीवनातील प्रत्येक पाऊल त्यांनी स्वीकारलेल्या सिद्धांतांनुरुप पडत असते तोच पुरुष वंदनीय आणि अनुकरणीय मानला जातो. कृतीशिवाय सिद्धांतनिष्ठा पांगळी असते. अशा निरर्थक गप्पा किंवा कृतीहीन सिद्धांतांनी कोणतेही कार्य कधी होऊ शकले नाही; भविष्यात कधी होणारही नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघास जर प्रतिष्ठा प्राप्त करून घ्यावयाची असेल, जनतेच्या मनात संघाच्या कार्यासंबंधी आदरभावना निर्माण करायची असेल आणि जर संघाचे कार्य व्यवस्थितपणे प्रगतीपथावर नेण्याची आपली आकांक्षा असेल तर संघाचे सिद्धांत आणि स्वयंसेवकांचा व्यवहार याचा मेळ घातला गेला पाहिजे.                                                                          प. पू. डॉ . हेडगेवार

१२३ स्नेहसंबंध

                                               १२३ स्नेहसंबंध 
१ 
            एकाच विचारधारेचे लोक एकत्र आल्यानंतर त्यांच्यात मतभेद उत्पन्न होऊ शकतात. आणि त्यात स्पर्धा उत्पन्न होऊन ते प्रतिस्पर्धी बनू शकतात. या अवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी ' व्यक्तिगत स्पर्धा टाळणे ' हाच श्रेष्ठ उपाय आहे. ध्येयनिष्ठे बरोबरच जर संस्थेविषयीचे प्रेम असेल तर काही प्रमाणात तणाव उत्पन्न झाला तरी असा विचार केला जातो की ' मी या संस्थेपासून दूर जाणार नाही. ' जेव्हा कार्यकर्त्यात परस्पर घनिष्ठता, व्यक्तिगत स्नेहसंबंध आणि जवळीक असेल तर मग त्यास कोणासाठी संस्थेपासून दूर जाणे, भांडण करणे, संस्थेपासून अलिप्त राहणे सोपे तर नसतेच उलट फार कठीण असते. अशा घनिष्ठ प्रमाणात लोकांचे परस्परसंबंध निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे.

२ 
       आज संपूर्ण देशामध्ये भाषा, संप्रदाय, प्रांत इत्यादी विषयी भेदाचे विष भरलेले आहे, वाढत आहे. स्वार्थी राजकीय पक्ष वाढवित आहेत. ते विष उतरवून राष्ट्र शरीराला निरोगी व सुदृढ बनविण्यासाठी संघकार्य सोडून अन्य कोणतेही औषध नाही. सर्व विषयांना निर्विष बनविणारे हे साक्षात अमृत आहे. या दृढ श्रद्धेने व विश्वासाने आपल्या स्थानी पक्के राहून आपल्या बांधवांचे अंतःकरणातील सुप्त आत्मियत्व जागृत करण्याचे कार्य आपल्याला स्नेहाने, प्रेमाने करायचे आहे. कोणत्याही हिंदू व्यक्तिबद्दल व समूहाबद्दल मनात द्वेष न ठेवता, कोणावरही दोषारोपण न करता कौशल्य व अकृत्रिम प्रेमाचा व्यवहार यासाठी आवश्यक आहे. संपूर्ण देशात विषवायू पसरलेला आहे. त्याच्या प्रभावाने लोक मनापासून नाही तरी प्रवाहपतीत होऊन दुष्टपणा करतात. हे लक्षात घेऊन हे विषमय वातावरण दूर करण्याचे सहसपूर्ण कार्य आपल्याला करायचे आहे.                                                      प. पू. श्रीगुरुजी
        
                                                                      

१२४ समस्या निराकरण

                                     १२४  समस्या निराकरण 
          संघाचे अस्तित्व एका वर्धमान शक्ती समवेत टिकवून धरण्यात सभोवती उत्पन्न होणाऱ्या समस्यावर दोन प्रकारची उत्तरे सापडतात. एक तर समस्या उत्पन्नच होत नाहीत किंवा त्यांचे स्वरूप गंभीर बनू शकत नाही. आणि दुसरे म्हणजे समस्या निर्माण झाल्या तरी आपल्या शक्तीच्या भरवशावर लोकांना बरोबर घेऊन काही ना काही प्रमाणात त्या समस्यांचे निराकरण करण्यात यश मिळते.




         


१२५ स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

              १२५ स्वातंत्र्यवीर  विनायक  दामोदर सावरकर


        बरे, ईश्वराची दया असेल तर पुन्हा भेट होईलच . तोवर जर या सामान्य संसाराचा मोह होऊ लागला तर असा विचार करा की, मुलांमुलींची वीण वाढविणे व चार काटक्या एकत्र करून घरटी बांधणे ह्यालाच जर संसार म्हणावयाचे असेल, तर असले संसार कावळे-चिमण्याही  करीतच आहेत ! पण संसाराचा याहून भव्यतर अर्थ घ्यावयाचा असेल तर मनुष्यासारखा संसार थाटण्यात आपणही कृतकार्य झालो आहोत . आपली चार चूलबोळकी आपण फोडून टाकली, पण त्यायोगे पुढेमागे हजारो जणांच्या घरी क्वचित सोन्याचा धूर निघेल . 

                   

१२६ सिंधु नदी

                            १२६   सिंधु नदी

   जिच्या काठावर आमच्या प्राचीनतम वेदर्षींनी ऋचांची पहिली सामगायने गायिली, जिच्या पुण्यसलीलांनी आपल्या संध्यावंदनातील अर्घ्ये दिली आणि जिला अत्यादराने वेदातील देवतांमध्ये स्थान देऊन तिच्यावर सुंदरातील सुंदर सुक्ते रचली त्या तुला, हे अंबितमे, नदीतमे, देवीतमे  सिंधू आम्ही कधीही विसरणार नाही . 
     तुझ्या परिसरामध्ये आमच्या प्राचीनतम राजर्षींनी नि ब्रह्मर्षींनी केलेल्या यज्ञांच्या प्रदीप्त हुताशनात जेव्हा हवि समर्पिले तेव्हा अंतराळात उंच उंच दरवळत गेलेल्या त्यांच्या सुगंधांनी लालापित होऊन इंद्र, वरुण, मरुतादिक देव त्यांचे हविर्भाग स्वीकारण्यास तुझ्या तीरी येत आणि सोमरसासमवेत तुझे सुमधुर सलिल पिऊन प्रसन्न होत, त्या तुला हे सुरसरिते सिंधू , आम्ही कधीही विसरणार नाही ! 
                                                                 - स्वा. सावरकर 
        नहीं नहीं ! सारा विश्व भी यदि हमारा द्वेष करने लगे अथवा सारे विश्व का हमें द्वेष करना पडा, तो भी हम सिंधू से हमारा रिश्ता छोडेंगे नहीं, तोडेंगे नहीं | सिंधू को हम कैसे भुलेंगे | सिंधू के बिना हिंदू ? अर्थ के बिना शब्द ? प्राणो के बिना शरीर ? असंभव, असंभव | जब तक एक भी हिंदू जीवित है तब तक सिंधू को भूलना संभव नही |
                                                                       -  बॅ. सावरकर
 
                                                               

१२७ विजिगिषु वृत्ती

                                 १२७  विजिगिषु वृत्ती

        वास्तविक पाहता सहिष्णुतेप्रमाणेच विजिगिषु वृत्ती ही आवश्यक आहे आणि जर असे म्हटले की विजिगिषु वृत्तीची अधिक आवश्यकता आहे, तर ते खोटे नाही. विजिगिषु भावनेशिवाय कोणताही समाज जिवंत राहू शकत नाही आणि आपला विकासही करु शकत नाही.                                                     पं. दीनदयाळ उपाध्याय 

                                                                   

१२८ नेतृत्व

                                                         १२८ नेतृत्व 
    प्रवाह के साथ बहना नेता का नही, अनुयायी का लक्षण हैं | सच्चा नेता तो वह है जो अपने मत के  अनुसार परिस्थिती को बदल कर लोकमत को अपने ओर आकृष्ट कर लेता है | नेतृत्व की कसौटी लोकमतानुवर्तित्व नहीं, लोकनियंत्रण है | अवसर पडने पर लोकमत के विरुद्ध जाने में भी न हिचकना ही सत्यनिष्ठा है |                                                 प. पू. हेडगेवार