१५७ साम्यवाद
१
भौतिक दृष्टिकोनातून निर्माण झालेल्या लोकशाहीवादी शक्तीनी खरे बोलायचे तर लोकशाही सत्तेच्या आड दडून बहुसंख्य सामान्य जणांचे शोषण करणाऱ्या मूठभर पुंजीपती सत्ताधाऱ्यांनी सामान्य जनांना जगणे अशक्य करून टाकले. या सत्ताधाऱ्यांपासून मुक्ती मिळविण्यासाठी ज्या साम्यवादाचा विचार केला गेला तो सुद्धा भौतिकवादातूनच पुढे आला असल्यामुळे पशुतेच्या तांडवनृत्यालाच कारण झाला. विरोध विकास वाद हे समाजजीवनाच्या प्रगतीसाठी आवश्यक असे मानून अकारण भयानक रक्तपात, संहार व प्रलय यालाच कर्तव्य मानले. स्वर्गप्राप्तीची आशा दाखवून इस्लामने ज्याप्रमाणे शेकडो वर्षे हत्या मारपीट करून, पृथ्वीवर रक्ताच्या नद्या वाहविल्या त्याचप्रमाणे राज्यविरहित समाज निर्मितीच्या खोट्या आशावादाने कम्युनिस्ट पुन्हा एकदा संपूर्ण जगाला मानवी हत्याकांडाच्या खाईत ढकलण्यास कटिबद्ध आहेत. बाळशास्त्री हरदास
२
साम्यवाद आणि समाजवाद ही प्रगती नव्हे; प्रतिगती (पीछेहाट) आहे. यांच्यामुळे मानवाची पीछेहाट होते आहे. मानवी विकासक्रमाचा थोडा जरी अभ्यास केला तरी ही गोष्ट सहज लक्षात येते. मनुष्य आपल्या प्राथमिक अवस्थेत जडतत्त्वाचा विचार करतो आणि त्यातच रमून जातो. नंतर त्यास कंटाळतो, तेव्हा तो मानसिक पातळीवर पोहोचतो. विविध प्रकारच्या मानसिक प्रयत्नांनी तो आपले लक्ष विभाजित करतो. तदनंतर तो नाना प्रकारे बौद्धिक प्रगती करतो आणि तत्पश्चात सर्वांच्या पलीकडे जाऊन बुद्धीला अगम्य अशा परमात्म्याचा विचार करू लागतो. हीच त्याची खरी प्रगती असते. प . पू. श्रीगुरुजी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा