सोमवार, ८ डिसेंबर, २०२५

१६१ संस्कृती

                                                                    १६१ संस्कृती

       पश्चिमेत उदयास आलेल्या राजनीतीप्रधान कार्यपद्धतीत विशेष करून कम्युनिस्ट कार्यपद्धतीत राजसत्तेलाच परिवर्तनाचे एकमेव साधन मानले जाते. व म्हणूनच सत्ताप्राप्ती हेच साम्यवादी पक्षाचे एकमेव ध्येय असते. त्यासाठी साहित्यिक, श्रमिक व विद्यार्थ्यांचे त्यांच्या अधिपत्याखाली मंच निर्माण केले जातात. संस्कृतीला केंद्रबिंदू मानून राजकारण हे राष्ट्रजीवनाचे केवळ एक अंग आहे असे मानले जाऊ शकते व संस्कृतीच्या प्रकाशात जीवनाचे प्रत्येक क्षेत्रात राष्ट्रीय पुनर्निमाणाच्या दिशेने, रचनात्मक प्रयोग केले जाऊ शकतात. हे साम्यवादी बुद्धिमंत्तांना समजणे सुद्धा कठीण आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा