१५९ तरुण
१
ध्येयवादी प्रतिभावंतांच्या कल्पनांना मूर्त रूप देण्यासाठी जेव्हा तरुण पुढे येतील तेव्हाच राष्ट्राचा अभ्युदय होईल. राष्ट्राचे जीवन उसळत्या रक्ताने सळसळणाऱ्या तरुणांवरच अवलंबून असते. क्षात्रवृत्तीशिवाय राष्ट्र जिवंत राहूच शकत नाही. जो स्वतःचे संरक्षण करू शकत नाही तो मनुष्यच नव्हे, निव्वळ भित्रा. अशा भित्रेपणापासून मुक्त राहून जो पौरुषाचा अंगीकार करील त्या व्यक्तीस अथवा त्या राष्ट्रास जगात प्रतिष्ठा प्राप्त होईल.
२
भीषण संकटांचे आव्हान स्वीकारण्यातच ज्यांना मनस्वी आनंद वाटतो. त्यांच्या स्नायूंमध्ये तारुण्य सुलभ सामर्थ्य असते, डोळ्यात आदर्शाचे तेज असते; प्रतिकूल परिस्थिती आणि प्रलोभनांच्या वादळातही ते सागरासारखे गंभीर निश्चल राहू शकतात, असे तरुणच विजयामागून विजय संपादन करीत आपले अंतिम ध्येय साध्य करतात. प. पू. श्रीगुरुजी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा