१५६ समर्पण
१
कधी कधी स्वयंसेवकांच्या मनात काही दान करावे असा विचार येतो. पण दान करणारा तो कोण ? एकदा स्वयंसेवक झाला म्हणजे तो स्वतःच संघाचा होत असतो. मग त्याच्या जवळ दान करण्यासाठी उरतेच काय ? आणि मग पैसे देऊन स्वयंसेवकांची आपल्या कर्तव्यातून सुटका होत नाही. कारण ' काया, वाचा किंवा मनाने ' असे आपण प्रतिज्ञेत म्हटलेले नाही तर तेथे तन-मन-धनाचा एकत्रित उल्लेख आहे. आपली सर्व ऐच्छिक सुख संपत्ती संघ कार्यासाठी देईन अशीच भावना या एकत्रित उल्लेखात आहे. यालाच म्हणायचे समर्पण. - पू . श्रीगुरुजी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा