१५१ साधना
१
मानवी जीवन रूपांतरीत करणे हाच साधनेचा अर्थ आहे. जीवनाच्या रूपांतरासाठी केवळ बाह्य परिवर्तनाने भागणारे नाही. त्यासाठी मानवी जीवन नवीन आदर्शांच्या आधारावर अनुप्राणीत केले पाहिजे. त्या आदर्शाचे अनुसरण करताना आपणास आहुती दिली पाहिजे. आदर्शाच्या बलिवेदीवर स्वतःच बळी दिल्यानंतर माणसाचे विचार, उक्ती आणि कृती यात एकसूत्रता येते. त्याचे अंतर्बाह्य रूप एक होते. संपूर्ण जीवन एका आदर्श सूत्रात गुंफले जाते. या क्षणी तो जीवनाचा नवीन रस, नवीन अर्थ, नवीन आनंद शोधू शकतो. त्याच्यासमोर समग्र विश्व नव्या प्रकाशात प्रकट होते. नेताजी सुभाष
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा