शनिवार, २४ जानेवारी, २०१५

८ . ध्येय

                                ८ .  ध्येय 

        आपल्या हिंदू राष्ट्राला सर्वांगीण वैभव प्राप्त करून देऊन त्याचे सर्वदिक् श्रेष्ठत्व पुन: प्रस्थापित करणे हे आपले एकमात्र परम लक्ष्य आहे. या लक्ष्याचे यथार्थ आकलन होण्यासाठी, आपल्या प्रार्थनेत आपण ज्याला ' परं वैभवन् ' म्हणतो त्याचा नेमका अर्थ काय आहे ते नीट समजावून घेतले पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या राष्ट्राची ही परमवैभवसंपन्न स्थिती निर्माण करून ती सुस्थिर कशी करावयाची हेही समजावून घेतले पाहिजे.

२ 
       मनुष्याच्या स्वार्थावर नियंत्रण ठेवणे हे एक कठीण काम आहे. आपल्या देशातील विचारवंतांनी त्याच्या मार्ग सांगितला आहे, तो असा की मनुष्यासमोर एखादे श्रेष्ठ ध्येय ठेवले पाहिजे. असे ध्येय समोर असल्यास, ते प्राप्त करण्यासाठी मनुष्य पूर्ण सामर्थ्यांशी प्रयत्न करतोच. परिणामतः त्या श्रेष्ठ ध्येयासमोर स्वार्थ स्वाभाविक नगण्य ठरतो. मनुष्य स्वतः आपले दुर्गुण दूर करीत व सद्गुणांचा विकास करीत सुयोग्य बनण्याचा प्रयत्न करतो.

       वयम् उच्चतमं लक्ष्यम् आत्मनः पूरतः स्थापयेम | एतत्स्य लक्षस्य विषये यावत्पर्यंत शृणुयाम, यावत् अस्माकं हृदये, मस्तिष्के नाडीषुच तत् लक्षं स्थिरं तिष्ठेत यावच्च अस्माकं रकतस्य प्रत्येकास्मीन् कणे तत् च प्रविशेत्  यावच्च प्रतिरोमं न  संसक्तं  स्यात् | वयम् एतत् लक्ष्यम्  सदा ध्यायेम् | अस्माकं हृदय पूर्णत्वे वाणी प्रगती भवती हृदय पूर्णत्वेन एव वाणी प्रकटी भवति |  हृदय पूर्णत्वेन एवहस्तौ कार्य कुरुत: च |                         -  स्वामी विवेकानंद 

         वास्तवतेच्या चिखलातूनच जीवनाचे कमलपुष्प उमलते . परंतु ध्येयस्वरूपी सूर्यप्रकाशाच्या सहाय्यानेच ते कर्मजीवनाच्या पृष्ठभागाच्याही वर येऊन कल्याणमय प्रसन्नतेचा विकास करू शकते . अत्यंत मलीन परंतु पोषण देणाऱ्या अशा चिखलापासून कमलपुष्पास वेगळे केले तर पाण्यावर तरंगत राहूनही ते सडून जाईल . सूर्यप्रकाशापासून त्यास नाना प्रकारे वंचित ठेवले तर त्या कमलपुष्पाचे अस्तित्वही असंभवनीय होईल . वास्तवता स्वीकारलीच पाहिजे परंतु त्यासमवेत ध्येयवादाची प्रेरणा स्वीकारणेच प्राणरूप होईल .                                                                                                                                                     -काका कालेलकर 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा