शनिवार, २४ जानेवारी, २०१५

९ . भारतमाता

                              ९ . भारतमाता  
       भूतकाळाचा अभिमान, वर्तमानकाळाच्या परिस्थितीची वेदना व भविष्याबद्धल उत्कट ओढ देशभक्तीरुपी वृक्षाचा बुंधा व फांद्या आहेत . देशासाठी सर्वस्वाचा होम, स्वार्थाचे विस्मरण, श्रेष्ठ सेवा व उच्च कोटीची सहनशीलता हीच या वृक्षाची फळे होत . देशाच्या ठिकाणी मानवतेची अनुभूती घेणे, आईचे रूप पाहणे, तिचाच सतत ध्यास, आराधना व सेवा करणे हाच या वृक्षाला जिवंत ठेवणारा जीवनरस आहे .                                                                                                                                                            - योगी अरविंद 

 २
      भारत इस देश की जमीन यहाँ की नदियों और यहाँ के पहाड़ों का नाम नहीं है। इस देश के वासियों का सामूहिक नाम भी भारत नहीं है। भारत एक जीवित सत्ता है, यह सत्ता उतनी ही जीवित जागृत है जितने शिव आदि देवता। सभी देशोंकी अपनी अपनी आत्मा होती है और अगर तुम देश में परिवर्तन करना चाहते हो तो वह अवास्तविक होगा। भारत एक देवी है, अगर वह चाहे तो मानव रूप में प्रकट हो सकती है।                                                                                                                                                                                     - श्री मां 

       आज आपली भारतमाता आपल्याला हाक देत आहे . तिला दुसरे काही नको आहे. तिला तिचे तरुण, बुद्धिमान, सेवारत, पौरुषसंपन्न, पराक्रमी पुत्र हवे आहेत. नारायण म्हणजे शाश्वत ज्ञान आणि नर म्हणजे पराक्रम. जेथे या दोघांचा संगम होतो तेथे विजय निश्चित असतो. असे ज्ञान पौरुष संपन्न लोकच इतिहास घडवितात. भारतमातेला आज असेच पुत्र हवे आहेत.                                                                                          - श्रीगुरुजी 

४ 

      आम्ही राष्ट्र देवतेच्या उपासनी लागलो आहोत. यासाठी तन-मन- धन, बुद्धी, चित्त तसेच जे काही ईश्वर कृपेने आपणाला मिळाले आहे, ते सर्व त्याला समर्पित आहे. या प्रकारच्या शुद्ध भावनेला आम्ही आपल्या अंत करणामध्ये चांगल्या प्रकारे निर्माण करू आणि त्याचा विसर कधीही पडू देऊ नये.                                                                  - महर्षि अरविंद

    आपली मातृभूमी भारतमाता हाच आपल्या राष्ट्रजीवनाचा आधार आहे. भूमी, आकाश आणि पाणी देऊन ज्याप्रमाणे तिने आपले पोषण केलेले आहे, तसेच स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या वीरांना तिने डोंगरकपारीत आश्रय दिलेला आहे. अनेक संत, सम्राट, वीर यांना जन्म देऊन तिने आपल्या पुत्रांचे पित्याप्रमाणे रक्षण केलेले आहे; शिवाय ज्ञान देऊन आपल्यालाच नव्हे तर जगालाही मार्ग दाखविलेला आहे. थोडक्यात, आपली मातृभूमी माता, पिता आणि गुरु यांची त्रिवेणी मूर्ती आहे. 

                                               - पू . श्रीगुरुजी 

६ 

      आमची ही वत्सल मातृभूमी वात्सल्याने परिपूर्ण असल्यामुळे आम्ही येथे सुखाने नांदत आलो आहोत. ही महन्मंगल पुण्यभू आहे. हिच्या सेवेसाठी आमचे जीवनपुष्प अर्पण करण्यास आम्ही सिद्ध आहोत. हिच्या सर्वंकष प्रगतीसाठी आमचे जीवनसर्वस्व वाहण्यास आम्हास धन्यता वाटते. 

हे प्रभो ! ही विश्वात सदैव अजेय राहो. त्यासाठी सामर्थ्य देण्यास तू समर्थ आहेस. या धर्माचे रक्षण आमच्याकडून होवो. परंतु हा मार्ग काट्याकुट्यातून जाणारा आहे याची आम्हाला जाणीव आहे. असा मार्ग आम्ही स्वयंप्रेरणेनेच स्वीकारण्याचे ठरविले आहे. यातच आमच्या जीविताचे सार्थक आहे. सर्वंकष भरभराटीच्या मार्गाने जाऊन त्यातून नि:श्रेयसाचा मार्ग स्वीकारण्यात आम्हाला धन्यता वाटते. हे राष्ट्र परमवैभवाप्रत नेण्यासाठी हे मातृभूमे तुझे आम्हाला सदैव आशिर्वाद लाभोत हीच आमची जीवनाकांक्षा आहे. 

         भूतकाळाचा अभिमान, वर्तमानकाळाच्या परिस्थितीची वेदना व भविष्याबद्धल उत्कट ओढ देशभक्तीरुपी वृक्षाचा बुंधा व फांद्या आहेत . देशासाठी सर्वस्वाचा होम, स्वार्थाचे विस्मरण, श्रेष्ठ सेवा व उच्च कोटीची सहनशीलता हीच या वृक्षाची फळे होत . देशाच्या ठिकाणी मानवतेची अनुभूती घेणे, आईचे रूप पाहणे, तिचाच सतत ध्यास, आराधना व सेवा करणे हाच या वृक्षाला जिवंत ठेवणारा जीवनरस आहे .

                                                                                                        - महर्षि अरविंद

८ 

     भारतात राहून सुद्धा जे लोक भारतमातेचा जयजयकार करण्यास कचरतात ते भारतीय झालेले नाहीत हे सत्य धूर्त इंग्रजांनी ओळखले.  ' एकजन ' ही भारताची एकरसतेची भावना नष्ट करण्यासाठी भारताला ' इंडिया ' म्हणण्यात त्यानी सुरुवात केली. आपल्या संविधानात ' इंडिया इज भारत ' असा आपल्या देशाचा उल्लेख केला गेला आहे.  त्यावरून इंग्रज आपल्या खेळीत किती यशस्वी झाले हे लक्षात येते. भारत हा शब्द इंग्रजांना उच्चारता येत नाही हे खरे नाही. वास्तविक भारतमातेचेच विस्मरण व्हावे ही त्यांची आंतरिक इच्छा होती. इंडिया म्हटल्यावर कोणी इंडियामाता म्हणू शकणार नाही व त्याचबरोबर भारतमातेच्या जयजयकाराचा आपोआप लोप होईल असा त्यांनी विचार केला.

                                             - पंडित दीनदयाळ उपाध्याय

९ 

     राष्ट्र का विकास एक ऐसी प्रगती है, जो आधुनिक अवस्था में मानवता के लिये अत्यंत आवश्यक है | मनुष्य के स्वार्थ, परिवार के स्वार्थ और वर्ग के स्वार्थ की गहरी जडें आज भी अतीत में जमीं हुई हैं |अब विशालतर राष्ट्रीय आत्मा में उन्हें अपने आपको विलीन करना सीखना होगा ताकि मानव जाती में भगवान का क्रम विकास हो सके | अत: इस युग का धर्म है राष्ट्रवाद | भगवान हमारी सार्वजनीन भारतमाता के रूप में अपने आपको हमारे सामने व्यक्त कर रहे हैं |

                                     - महर्षी अरविंद

१०

    आमची ही पवित्र मातृभूमी धर्म व दर्शन यांची भूमी आहे. ही महा मानवीय आध्यात्मिक महापुरुषांची जन्मभूमी आहे. अपरिग्रह व संन्यास यांची भूमी आहे. अगदी अति प्राचीन काळापासून आत्तापर्यंत केवळ येथेच मनुष्यप्राण्यासमोर उच्चतम आदर्श राहत आला आहे.

                                         - स्वामी विवेकानंद

११

      आमची ही मातृभूमी ' नानारत्नवसुंधरा ' आहे, म्हणजेच धनधान्याने परिपूर्ण आहे. हिच्यामुळे आमचे भरण पोषण होते. म्हणून ती आमची माता आहे. हिच्या आश्रयानेच आजपर्यंत आपण अनेक संकटांचा धैर्याने मुकाबला करू शकलो, म्हणून ही आमची रक्षणकर्ती म्हणजेच पितृतुल्य आहे. सृष्टीचे स्वरूप कसे आहे ? माणसाला शाश्वत सुख कसे प्राप्त होईल ? इ. बुद्धीच्या पलीकडील प्रश्नांचे समाधान करणारे व परमसुख देणारे अध्यात्मशील इथेच प्रगट झाले आणि त्याच्या प्राप्तीचा मार्गही या भूमीनेच दाखवला. म्हणूनही गुरुरुपिणी आहे. 

                                                        श्रीगुरुजी

१२

     हमारे लिए इस भूमी से पवित्रतर और कुछ नही हो सकता | इस भूमी की धुली का एक-एक कण जड और चेतक प्रत्येक वस्तू , प्रत्येक काष्ठ और प्रस्तर,  प्रत्येक वृक्ष एवं नदी हमारे लिए पवित्र है | हमारा देश हमारे लिए कभी निर्जीव अचेतन पदार्थ नही रहा, वरन् सदैव समान भावसे अपने बच्चों के लिए सजीव दिव्य मां के रूप मे रहा है, चाहे वे बच्चे निम्नतम वर्ग के हों अथवा उच्चतम वर्ग के |                                  - प. पू . डॉ. हेडगेवार

१३

     गरीब, अज्ञानी आणि दलित यांच्या बद्दल सहानुभूतीचा आणि त्यांच्या उन्नतीसाठी सतत कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांचा वारसा मी तुम्हाला देत आहे. जे गरीब आहेत, जे दलित आहेत, जे खालच्या जातीचे समजले जातात त्यांच्यासाठी कष्ट करा. बलिदान करा. आपल्या संपूर्ण जीवनाचे बलिदान करा. 

     बंधुंनो ! आपण सर्वजण सतत कार्य करूया ! ही झोप घेण्याची वेळ नाही. भारताचे भविष्य आपल्याच कार्यावर अवलंबून आहे. भारतमाता आपल्याकडे मोठ्या आशेने पहात आहे. उठा ! जागे व्हा आणि आपल्या या भारत मातेला तिच्या त्या शाश्वत सिंहासनावर पुन्हा विराजमान झालेली पहा. तिच्यात नवचैतन्याचा संचार होऊ द्या. आणि पूर्वी कधीही तिला लाभले नसेल अशा अपूर्व तेजाने ती परत तळपून द्या.                                           -  स्वामी विवेकानंद

१४ 

       या भूमीला पवित्र मानणारा, तिला आपली माता, पिता, रक्षक, गुरु, सर्वश्रेष्ठ आणि तीच जगताचा मूलाधार आहे असे मानणारा तिचा पुत्ररुप हिंदू समाज आहे. हाच हिंदू वेदकाळापासून गर्जना करीत आला आहे की, ' ही माझी माता आहे व मी तिचा पुत्र आहे. ' माता भूमि: पुत्रो s हं पृथिव्या:                                                                     पू. श्री गुरुजी

१५

      ही आपली पवित्र भूमि आहे व तिची सेवा मला करायची आहे. आम्ही या भूमीचे-हिंदूराष्ट्राचे-तेजस्वी संतान आहोत, हिची सेवा करून विश्वात हिला सर्वश्रेष्ठ बनवणे हे आमचे परम कर्तव्य आहे. आपल्या सर्व शक्तीचा उपयोग हे कर्तव्य पूर्ण करण्यासाठीच करून या हिंदू राष्ट्राला परमवैभवाच्या सर्वश्रेष्ठ पदावर सुप्रतिष्ठित करणे हीच आजच्या काळाची मागणी आहे.        प. पू. श्रीगुरुजी


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा