शनिवार, २४ जानेवारी, २०१५

१० . भगवा ध्वज

                           १० .  भगवा ध्वज

           स्वयंसेवकाची निष्ठा कोणत्याही एका व्यक्तीच्या ठिकाणी नको , माणसे येतात आणि जातात, माणसे स्खलनशील असतात,या भूमीचा अनादिकालापासूनचा इतिहास व येथे विकसित झालेल्या राष्ट्रीय संस्कृतिने शिकविलेली जीवनमूल्ये यांचे प्रतीक म्हणजे भगवा ध्वज, त्याचा यथोचित आदर आपण केला पाहिजे.                                                                                                                                           - डॉ. हेडगेवार 
          भगवा ध्वज आमच्या महान संस्कृतीचा पूर्ण परिचय करून देणारे प्रतीक स्वरूप आहे. आमच्यासाठी तो परमेश्वरस्वरूप आहे. म्हणून आम्ही त्याला आपल्या गुरुस्थानी ठेवणे अत्यंत योग्य समजत आहोत. त्याची सोनेरी भगवी कांती पवित्र यज्ञवेदींच्या पावन ज्वालांसमान आहे. भोगलालसेला मातीमोल करणाऱ्या संन्याशाच्या त्यागवृत्तीची द्योतक आहे. त्यागमय जनसेवा करण्याचे संकेतचिन्ह आहे.                                                                                                                                                                                                 - श्रीगुरुजी 
        संघाने आपला गुरु म्हणून शतकानुशतके चालत आलेला, तसेच प्रेरणा देणाऱ्या महापुरुषांचा पराक्रम, पौरुष व बलिदानाचा साक्षी परमपवित्र भगवा ध्वज आपला गुरु मानला आहे. पूजा ही पूर्णत्वाचीच होते. आदर्श हा पूर्णत्वाचा असणे श्रेयस्कर आहे. या कारणामुळेच संघाने कोणत्याही व्यक्तीला गुरु मानलेले नाही. व्यक्ती कितीही स्थितीप्रत गेली तरी ' कर्मणा गहनो गती: ' या न्यायाने अध:पतीत होऊ शकते. तोच महापुरुष की ज्याचे सानिध्य आम्हाला सत्प्रवृत्त करते. अशा अनेक महापुरुषांना अनादी कालापासून जो मार्गदर्शन करीत आलेला आहे. तो जरी मूक असला तरी त्याला सर्वश्रेष्ठ गुरु मानले पाहिजे.

       सर्वोच्च श्रद्धास्थान असलेल्या सर्व शक्तिना आव्हान देणाऱ्या या भगव्या ध्वजालाच आपण हृदयात स्थान देऊ. त्याचे समोर नतमस्तक होऊ. त्यालाच जीवन समर्पित करू या भावनेने या पवित्र ध्वजाचा आपण गुरु म्हणून स्वीकार केला आहे. आपल्या राष्ट्राला जगद्गुरुचे स्थान मिळवून देण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांचा संचय करण्याची शक्ती या ध्वजामुळे अंतःकरणात जागृत होते. आपल्या जीवन पद्धतीचा अखंड नंदादीप असणाऱ्या, राष्ट्रपुरुष समान भासणाऱ्या या ध्वजाच्या सेवेसाठी सर्वस्वाचा त्याग करण्यात आपल्याला आनंद आहे. या ध्वजाची पूजा करण्याचा हाच योग्य मार्ग आहे.

         वेदकाळापासून आजपर्यंत आपण ज्या राष्ट्रीय प्रतीकापासून स्फूर्ती घेत आलो आहोत, ज्यामध्ये वर्षानुवर्षे उत्थान व पतनाच्या रोमांचकारी क्षणांच्या गाथा गुंफल्या आहेत. ज्याच्यामध्ये त्यागी, तपस्वी, पराक्रमी, दिग्विजयी, ज्ञानी, ऋषी, मुनी, सम्राट, सेनापती, कवी, साहित्यकार, संन्यासी आणि असंख्य कर्मयोग्यांच्या  चरित्राचे स्मरण अंकित आहे, जेथे प्रत्यक्ष अनुभूतीतून आपल्या जीवनाचा होम करणारी असंख्य उदाहरणे आमचे स्मृतिपटलावर नृत्य करतात तो परमपवित्र भगवा ध्वज हाच आमच्या अखंड राष्ट्रीय परंपरेचे प्रतीक म्हणून आमचे समोर आहे. तोच आमचे स्फूर्तिकेंद्र आहे. भगवा ध्वज हाच आमचा गुरु आणि मार्गदर्शक आहे.               पं. दीनदयाळ उपाध्याय

        आपल्या हिंदू राष्ट्रासंबंधीच्या अमूर्त भक्ती भावना साकार करण्यासाठी आपणाजवळ उपलब्ध असलेले व्यापक साधन म्हणजे आपला परमपवित्र भगवा ध्वज. तो राष्ट्राचे प्रतीक असून प्रत्येकास प्रेरणा देत असतो. या राष्ट्रध्वजामध्येच आपणास आपल्या देशाचा संपूर्ण इतिहास आढळतो. राष्ट्राचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळही त्यात सामावलेला आहे. तोच आपल्या सांस्कृतिक परंपरेचे द्योतक आहे.                                                                                                                                   पंडित दीनदयाळ उपाध्याय
          भारताने जगाला गुलाम बनविण्यासाठी युद्धे केली नाहीत. युद्ध आत्मरक्षणार्थच झाली. परंतु आत्मरक्षणाचा अर्थ आपल्या तुच्छ ऐहिक जीवनाचे रक्षण असा नाही, तर आपल्या संस्कृतीचे रक्षण हाच राहत आला आहे. ' शरीर नश्वर व आत्मा अमर ' या तत्त्वाचा अंगीकार करून धर्म, संस्कृती आणि सभ्यता यांच्या रक्षणार्थ महान बलिदान घडले. हे सर्व आदर्श आपल्यापुढे ठेवणारे एखादे प्रतीक असल्यास त्यापासून अवश्य स्फूर्ती मिळते. यज्ञातील त्याग, तपश्चर्या, उद्योग आणि समर्पणशिलता या साऱ्या भावनांचा संस्कार हा ध्वज करतो, म्हणूनच अनादी काळापासून हा आमचा राष्ट्रध्वज आहे.                                                                        पं. दीनदयाळ उपाध्याय

           हम लोगों ने इस पवित्र पताका को अपने समक्ष गुरु के रूप में रखा है | इससे अति प्राचीन काल से आज तक के अपने राष्ट्र के सभी भव्य कार्य, उसके द्वारा संपादित समस्त पराक्रम और तेजेस्विता आखों के समक्ष प्रकट हो जाती है | जगद्गुरु का स्थान प्राप्त करने के लिए आवश्यक सभी गुणों का समुच्चय इस एक पताका के दर्शनमात्र से अपने अंत:करण में जागृत हो जाता है | यह तो हमारे जीवन-परंपरा की अखंड ज्योती के रूप में, हमारे राष्ट्रपुरुष अर्थात् प्रकट परमात्मा के नाते हमारे सामने है | इसकी सेवा के लिए हमें सब कुछ न्योछावर करने की आवश्यकता है |                                                                                              परमपूजनीय गुरुजी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा