शनिवार, २४ जानेवारी, २०१५

२. हिंदुसाम्राज्यदिन

                                    २.  हिंदुसाम्राज्यदिन
                शिवाजी महाराजांना आदर्श ठेवले तर त्यांनी हिंदुत्वाच्या रक्षणार्थ जे पराक्रम केले ते आठवतात. जितके सामर्थ्य भगव्या ध्वजाचे आहे, तितकेच शिवरायांचे आहे. जो इतिहास ध्वजाच्या दर्शनाने आठवतो आणि त्यापासून जी स्फूर्ति  मिळते, तीच स्फूर्ति शिवरायांच्या चारित्र्यापासून मिळते.  जो ध्वज खरोखरच धुळीत पडला होता, तो शिवरायांनी उचलून हिंदू पदपादशाहीची प्राणप्रतिष्ठा केली व मरु घातलेले हिंदुत्व जागवले. तेव्हा तुम्हाला जर व्यक्ती आदर्श ठेवायची असेल, तर शिवरायांनाच ठेवा.            - पू . डॉक्टरजी  

         
   हिंदू समाजाला चिरंतन दास्यात जखडून टाकण्यासाठी जे जे म्हणून विधर्मी हिंदुस्थानात आले आणि राहिले आहेत, त्याच्या उद्दंड आक्रमणापासून हिंदू समाजाला वाचविणे, हेच आमचे ध्येय आहे. त्यासाठी कितीही कष्ट सोसावे लागले तरी आम्ही ते सोसू ; कितीही संकटे झेलावी लागली तरी आम्ही ती झेलू . एवढेच नव्हे तर त्यासाठी आत्मबलिदानही करू , अशी मनोवृत्ती संपूर्ण हिंदुसमाजात निर्माण करणे हेच आमचे ध्येय आहे. हिंदुसंघटनेचे पवित्र कार्य या ध्येयप्राप्तीसाठीच आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा