३. गुरुपौर्णिमा
१
१
आपण आयुष्यभर जो पैसा मिळवितो तो वस्तुतः भोवतालच्या समाजाचे सहकार्य असल्यामुळेच आपल्याला मिळत असतो. केवळ पैसाच नव्हे - जीवनातील सुरक्षितता आणि सुख या गोष्टीही समाजामुळेच आपल्याला लाभत असतात. त्यामुळे समाजाचे हे ॠण जास्तीतजास्त प्रमाणात फेडणे हे आपले कर्तव्य ठरते. रोज आपण एक तास शाखेत जाऊन तन-मन-बुद्धी अर्पण करतो यामागेहि खरे म्हणजे समाजाचे हे ॠण फेडण्याचीच भूमिका आहे . संघात स्वार्पणाचे हे जे संस्कार करण्यात येतात त्यामधूनच गुरुदक्षिणेची प्रथाही उदयास आली आहे.
२
आपण राष्ट्रदेवतेची उपासना करतो म्हणून आपले शरीर, मन, बुद्धी, संपत्ती आणि तसेच आणखी जे काही ईश्वरकृपेने आपणास मिळाले आहे ते सर्व राष्ट्रासाठी समर्पित आहे, अशा प्रकारची विशुद्ध भावना आपल्या अंतःकरणात आपण निर्माण करावी. या गोष्टीचे कधी विस्मरण होऊ देऊ नये
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा