शनिवार, १३ सप्टेंबर, २०२५

१४३ मोक्ष

                                            १४३   मोक्ष

      अमार्याद उपभोगाची लालसा आणि तिच्या तृप्तीसाठी स्पर्धेची शर्यत यामुळे सुख मिळत नाही. त्यासाठी आपल्या जीवनात संयम असण्याची आवश्यकता आहे. व्यक्ती म्हणून व समाज म्हणूनही संयम असणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या येथे चार पुरुषांची कल्पना मांडली आहे. चार पुरुषांची कल्पना संयमशील जीवनासाठी आहे. व्यक्ती व समाज या दोघांच्याही दृष्टीने कर्तव्याचा विचार केला आहे. धर्माने म्हणजेच कर्तव्यभावनेने नियंत्रित राहूनच अर्थ व काम या पुरुषार्थांची आराधना करावी. त्याच वेळी मोक्षाची इच्छा सतत राहावी. यामुळेच आपल्याला आपल्या मूळ सुखमय स्वरूपाची अनुभूती येईल. ही इच्छा म्हणजेच चौथा पुरुषार्थ ' मोक्ष ' होय. नदीचे पाणी जसे दोन तटांच्या मधून वाहते तेव्हा सर्व त्या पाण्याचा उपयोग करू शकतात. ती तट फोडून वाहू लागली तर विध्वंसाचे कारण बनते. त्याचप्रमाणेच ऐहिक उपभोगाची नदीही धर्म व मोक्ष या दोन तटांच्या मधूनच वाहणे सुखकारक आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा