गुरुवार, २० मार्च, २०२५

१४२ सातत्य

                                                                       १४२    सातत्य 

        फुटीरतेच्या अनेक भावना आपले समाज जीवन पोखरून टाकीत आहेत. फुटीरतेच्या रोगाची मुळे खूप खोलवर गेली आहेत. त्यावरील उपायही अगदी मूलगामी असला पाहिजे. म्हणूनच आपला असा आग्रह असतो की रोज नियमितपणे शाखेवर आले पाहिजे. एखादा विचार रोज नित्यनेमाने ठरल्या वेळी पुन: पुन्हा सांगितला गेला तर तो हळूहळू अंतःकरणात खोलवर बिंबत जातो व शेवटी आपल्या स्वभावाचा अविभाज्य पैलू बनतो. नियमितपणा आणि वक्तशीरपणा याचा संघात एवढ्या टोकाचा आग्रह धरण्यात येतो याचे कारण हेच आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा