१४४ राष्ट्र
१
हिंदू समाजाचे सुख हेच माझे व माझ्या कुटुंबाचे सुख. हिंदुसमाजावरील संकट म्हणजे आपणा सर्वांवरील संकट आणि हिंदू समाजाचा अपमान म्हणजे सर्वांचा अपमान अशी आपलेपणाची भावना हिंदूमात्राच्या रोमा रोमात भिनली पाहिजे. हाच राष्ट्रधर्माचा मूलमंत्र होय.
२
राष्ट्र म्हणजे परस्पर विरोधी परंपरा, संस्कृती व भावना असलेल्या लोकांचे ओढून ताणून आणून बांधलेले गाठोडे नव्हे, तर धर्म, संस्कृती, देश, भाषा आणि इतिहास यातील साधर्म्यामुळे ' आम्ही सर्व एक आहोत ' याची जाणीव होऊन आम्ही सर्व एक राहू असा निश्चय केल्याने जी एक अपूर्व आत्मियता आणि तन्मयता निर्माण होते तेच राष्ट्राचे अधिष्ठान आहे. प. पू. डॉ. हेडगेवार
३
आजच्या तरुण पिढीला समाज जगला तरच मी जगू शकेन, असे वाटतच नाही. आपण कुटुंबनिष्ठेच्या रोगाने पछाडलेलो आहोत. ज्यांच्या मनात व्यक्तिगत स्वार्थाला यत्किंचितही स्थान नाही असे खरे देशभक्त किती असतील ? फारच थोडे. हिंदु राष्ट्राचा विचार करताना एका व्यक्तीचा विचार मनातून काढून टाका. मी आणि राष्ट्र एकच, अशा विचाराने तन्मय होतो तोच खरा राष्ट्र सेवक होय. प . पू. डॉ. हेडगेवार
४
हमारी प्राचीन राष्ट्रव्यवस्था का एक अनोखा पक्ष यह था कि उसमें संपत्ती के उत्पादन को राजनितिक सत्ता से अलग रखने की सावधानी बरती थी | इन दोनो शक्तियों का एकही व्यक्ती अथवा एकही वर्ग के हातों केंद्रित हो जाना या तो समाज का पतन करके उसका दास बनाता है, अथवा कष्टों के असह्य हो जाने पर लोगों को विद्रोह करने के लिए उद्दीप्त करता है | ऐसी स्थिती में सामाजिक स्थिरता, प्रगति येवं संपन्नता का अभाव हो जाना अपरिहार्य है | श्रीगुरुजी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा