सोमवार, १५ सप्टेंबर, २०२५

१४९ आक्रमण

                                                               १४९  आक्रमण 

     आपल्या देशावर तीन दिशांनी आक्रमण चालू आहे. पेट्रोडॉलर्सच्या मदतीने इस्लाम प्रचार अतिवेगाने वाढत आहे. हजारो इसाई पादरी आपल्या हिंदुसमाजाचे लचके तोडून इसाईंची जनसंख्या वाढवीत आहेत. त्यांना सुद्धा कोट्यावधी रुपयांची मदत परदेशातून मिळत आहे. रशियाचे आक्रमण पद्धतशीरपणे चालू आहे. प्रथम साम्यवादी साहित्य पाठविणे, साम्यवादाचा प्रचार करणे व आपल्या विचाराने भारलेले, आपल्या तालावर नाचतील असे काही लोक उभे करणे, त्यांच्यातीलच एखाद्याकरवी आमंत्रण मिळविणे व त्यानुसार सैन्य घेऊन त्या देशाचे उरावर बसणे आणि आम्ही हल्ला थोडाच केला आहे, आम्ही तर देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आलेलो आहोत असा कांगावा करणे हीच तर त्यांची रीत आहे.

रविवार, १४ सप्टेंबर, २०२५

१४८ बहुसंख्य

                                                                 १४८   बहुसंख्य 

१ 

        गांधारांनी दीडशे वर्षे आक्रमणाशी उग्र संघर्ष केला. परंतु अखेर त्यांना पराभव पत्करावा लागला. इतिहासाचे म्हणणे असे आहे की इस्लामचा प्रसार त्यांच्या श्रेष्ठ तत्वज्ञानामुळे झाला नसून तलवारीच्या बळावरच लोकांना धर्मांतरित करूनच झाला. अशा प्रकारे गांधाराचे बळजबरीने धर्मांतर केल्यानंतरच गांधाराचे अफगाणिस्थान झाले. १९४७ मध्ये अर्धा पंजाब, सिंध, बलुचिस्तान व अर्धा बंगाल आपल्यापासून तुटून अलग झाले. काय कारण ? त्याचे एकच कारण आहे. ज्या ज्या भागात हिंदू अल्पसंख्याक झाले तो तो भाग हिंदुस्थानापासून तुटला.

१४७ देशद्रोह

                                        १४७    देशद्रोह 

       गेल्या हजार वर्षांचे आपले जीवन अत्यंत खडतर, कष्टमय आहे. या काळात मूठभर तुर्क पठाण व मोंगलानी आपला देश पादाक्रांत करून आम्हाला गुलाम केले. हा दोष कोणाचा ? मुगल, पठाण व इंग्रजांचा का ? नाही, सुतराम नाही ! हा आमचाच दोष होय. आपल्या हिंदू समाजाचाच दोष होय. गेल्या हजार वर्षांत देशात स्वार्थ भावना प्रबल होत गेली. आपले कुटुंब, आपले दुकान, आपला मानसन्मान या भावनेतच आपण गुरफटून गेलो. आम्ही व्यक्तिगत व पारिवारिक स्वार्थापायी राष्ट्रघात करण्यासही कमी केले नाही. देशद्रोहही केला. इतकेच नव्हे तर आपल्याच लोकांनी स्वार्थ व परस्पर द्वेषापायी परकीयांना सहाय्य केले.

         जिस प्रकार पहिया तभी घूम सकता है जब उसकी धुरा पहिले के अंदर हो बाहर नहीं, और अपने से बाहर केंद्र वाले वृत्त का तो अस्तित्वही असंभव है | उसी प्रकार भारतीय जीवन भी यदि उसके जीवन का केंद्र भारत से बाहर रहा तो नष्ट-भ्रष्ट हुए बिना ना रहेगा |                                                                                     श्रीगुरुजी


१४६ राष्ट्रीय स्वाभिमान

                                                     १४६   राष्ट्रीय स्वाभिमान 

        राष्ट्रीय स्वाभिमान ही कोणत्याही स्वतंत्र देशाच्या दृष्टीने कमी महत्त्वाची गोष्ट नसते. या स्वाभिमानातच एक आत्मीयता दडलेली असते. या आदमी आत्मियतेतच कार्याच्या प्रेरणाचे तत्व सुप्तपणे अस्तित्वात असते. त्यालाच अहं म्हणतात. ही ' अहम् ' भावनाच राष्ट्रघटकांना नवनिर्माणाची आणि नवनवीन अविष्कारांची प्रेरणा देते. या आधारावरच स्वतंत्र राष्ट्रे कठीण प्रसंगात असे काही साहसी निर्णय घेण्यात यशस्वी होतात की त्यांची गणना ' ऐतिहासिक ' निर्णय म्हणून केली जाते. म्हणूनच हे निश्चित समजले पाहिजे की विदेशी विचारप्रवाह व ' वाद ' यांचे ओझे ओढत राहणे राष्ट्रीय स्वाभिमानास शोभणारी गोष्ट नाही.                                                                    पं. दीनदयाळ उपाध्याय      

१४५ समर्पित जीवन

                                                                  १४५  समर्पित जीवन

      आजकालच्या राजकीय वातावरणात चटकन् लोकप्रिय होण्याच्या लालसेने त्याग करणे शहाणपणाचे समजले जाते. परंतु हे हितकारक होईल का? हे आपले हिंदुराष्ट्र आहे हे ऐतिहासिक अनुभव सत्य नाकारले तर राष्ट्रासाठी त्याग बलिदान परिश्रम करण्याची व विजयाची इच्छा आकांक्षा शिल्लक राहील का? आज सुद्धा आपल्या व्यक्तिगत जीवनात सुख आशा आकांक्षांचा त्याग करून जे लोक निश्चयपूर्वक राष्ट्रसेवा करीत आहेत त्यांच्या अंतःकरणातील ' हे आमचे हिंदू राष्ट्र आहे ' व त्याला या विषयांमध्ये सार्वभौम संपन्न व सुखी करू ही प्रेरणा एकमेव कारण आहे. या प्रेरणेचा त्याग केला तर समर्पित जीवनाची परंपरा समाप्त होईल.

१४४ राष्ट्र

                                                             १४४    राष्ट्र

      हिंदू समाजाचे सुख हेच माझे व माझ्या कुटुंबाचे सुख. हिंदुसमाजावरील संकट म्हणजे आपणा सर्वांवरील संकट आणि हिंदू समाजाचा अपमान म्हणजे सर्वांचा अपमान अशी आपलेपणाची भावना हिंदूमात्राच्या रोमा रोमात भिनली पाहिजे. हाच राष्ट्रधर्माचा मूलमंत्र होय.

      राष्ट्र म्हणजे परस्पर विरोधी परंपरा, संस्कृती व भावना असलेल्या लोकांचे ओढून ताणून आणून बांधलेले गाठोडे नव्हे, तर धर्म, संस्कृती, देश, भाषा आणि इतिहास यातील साधर्म्यामुळे ' आम्ही सर्व एक आहोत ' याची जाणीव होऊन आम्ही सर्व एक राहू असा निश्चय केल्याने जी एक अपूर्व आत्मियता आणि तन्मयता निर्माण होते तेच राष्ट्राचे अधिष्ठान  आहे.                              प. पू. डॉ. हेडगेवार

         आजच्या तरुण पिढीला समाज जगला तरच मी जगू शकेन, असे वाटतच नाही. आपण कुटुंबनिष्ठेच्या रोगाने पछाडलेलो आहोत. ज्यांच्या मनात व्यक्तिगत स्वार्थाला यत्किंचितही स्थान नाही असे खरे देशभक्त किती असतील ? फारच थोडे. हिंदु राष्ट्राचा विचार करताना एका व्यक्तीचा विचार मनातून काढून टाका. मी आणि राष्ट्र एकच, अशा विचाराने तन्मय होतो तोच खरा राष्ट्र सेवक होय.                                                                                               प . पू. डॉ. हेडगेवार

           हमारी प्राचीन राष्ट्रव्यवस्था का एक अनोखा पक्ष यह था कि उसमें संपत्ती के उत्पादन को राजनितिक सत्ता से अलग रखने की सावधानी बरती थी | इन दोनो शक्तियों का एकही व्यक्ती अथवा एकही वर्ग के हातों केंद्रित हो जाना या तो समाज का पतन करके उसका दास बनाता है, अथवा कष्टों के असह्य हो जाने पर लोगों को विद्रोह करने के लिए उद्दीप्त करता है | ऐसी स्थिती में सामाजिक स्थिरता, प्रगति येवं संपन्नता का अभाव हो जाना अपरिहार्य है |                         श्रीगुरुजी



शनिवार, १३ सप्टेंबर, २०२५

१४३ मोक्ष

                                            १४३   मोक्ष

      अमार्याद उपभोगाची लालसा आणि तिच्या तृप्तीसाठी स्पर्धेची शर्यत यामुळे सुख मिळत नाही. त्यासाठी आपल्या जीवनात संयम असण्याची आवश्यकता आहे. व्यक्ती म्हणून व समाज म्हणूनही संयम असणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या येथे चार पुरुषांची कल्पना मांडली आहे. चार पुरुषांची कल्पना संयमशील जीवनासाठी आहे. व्यक्ती व समाज या दोघांच्याही दृष्टीने कर्तव्याचा विचार केला आहे. धर्माने म्हणजेच कर्तव्यभावनेने नियंत्रित राहूनच अर्थ व काम या पुरुषार्थांची आराधना करावी. त्याच वेळी मोक्षाची इच्छा सतत राहावी. यामुळेच आपल्याला आपल्या मूळ सुखमय स्वरूपाची अनुभूती येईल. ही इच्छा म्हणजेच चौथा पुरुषार्थ ' मोक्ष ' होय. नदीचे पाणी जसे दोन तटांच्या मधून वाहते तेव्हा सर्व त्या पाण्याचा उपयोग करू शकतात. ती तट फोडून वाहू लागली तर विध्वंसाचे कारण बनते. त्याचप्रमाणेच ऐहिक उपभोगाची नदीही धर्म व मोक्ष या दोन तटांच्या मधूनच वाहणे सुखकारक आहे.