मंगळवार, १० सप्टेंबर, २०१९

९९ कर्नल टॉड

                                ९९  कर्नल टॉड 

'  राजस्थान  '  चे लेखक 

ज्या देशातील दार्शनिक ग्रीस देशातील सिद्धांतांचे जनक आहेत आणि ज्यांच्या ग्रंथांपासून प्लेटो, थेल्स आणि पायथागोरस यांनी विद्या ग्रहण केली असे महर्षी आपल्या देशाखेरीज अन्यत्र कुठे मिळतील ? ज्यांचे खगोलशास्त्रीय ज्ञान पाहून आज देखील युरोपचे लोक आश्चर्यचकित होतात असे ज्योतिर्विद आणखी कुठे असतील ? ज्यांचे वास्तुशिल्प आणि ज्यांनी बनविलेल्या मूर्ती आजही आम्हाला भावमुग्ध करतात . ज्यांचे संगीत आजही आमच्या मनात आनंदाच्या लहरी उठवून सगळे दुःख डोळ्यातून वाहणारे अश्रू आणि चेहऱ्यावरील हास्य निर्माण करतात असे श्रेष्ठ पुरुष या देशाखेरीज अन्यत्र कुठे असतील बरे ? 

रविवार, ८ सप्टेंबर, २०१९

१०० विल्हेम व्हॉन हंबोल्ड

                     १००  विल्हेम व्हॉन हंबोल्ड 
विचारवंत 

आज अस्तित्वात असलेल्या समस्त भाषांमध्ये भगवद्गीता हे सर्वात उत्तम, बहुधा एकमेव तत्वज्ञानात्मक काव्य आहे. जगातील ही एकमेव सर्वोत्कृष्ट, सखोल आणि व्यापक कलाकृती आहे.

१०१ ऑर्थर शोपेनहॉवर

                       १०१ ऑर्थर शोपेनहॉवर
जर्मन लेखक व थोर तत्वज्ञ 

उपनिषदांमधील प्रत्येक वाक्यातून अभिजात, सखोल आणि उदात्त विचारांची निर्मिती होते आणि त्यामुळे सारे आसमंत दिव्यत्वाने भारून जाते. उपनिषदांइतके उच्चस्तरीय आणि (मानवजातीसाठी) लाभदायक वाङ्मय सबंध जगात दुसरे उपलब्ध नाही. तेच माझ्या जीवनाला समृद्ध करणारे तत्त्वज्ञान आहे आणि तेच माझा मृत्यूही उद्दात बनवील. आज ना उद्या (ही उपनिषदे) हीच संपूर्ण जगाचे श्रद्धाकेंद्रे बनतील.

१०३ राल्फ इमर्सन

                          १०३ राल्फ इमर्सन


भगवद्गीतेचे माझ्यावर अपार ऋण आहे. जणू एक संपूर्ण विश्व संवाद साधत असल्यासारखे हा ग्रंथ वाचताना (मला) भासले. भगवद्गीतेत नगण्य वा दुलक्षिण्यासारखे काहीच नाही. उलट एका शांत, संयत, धीरगंभीर आणि गूढ
स्वरांमधून एक कालातीत मार्गदर्शन मिळाल्याची आणि पिढ्यानपिढ्यांना पार करीत अगदी अद्ययावत-आजच्या प्रश्नांनाही समर्पक उत्तरे मिळाल्याची अद्भुत अनुभूती त्या तत्त्वज्ञानामधून सदैव प्राप्त होत राहते.

१०२ हेन्री डेव्हिड थोरो

                         १०२ हेन्री डेव्हिड थोरो 

अमेरिकन विचारवंत 



जेव्हा जेव्हा वेदातील एखाद्या भागाचे मी वाचन केले तेव्हा तेव्हा मला माझ्या अंतरात एक अद्भुत ज्योत प्रकाशित झाल्याची जाणीव होत असे. वेद विचारात संकुचितपणा वा एकांगीपणा यांचा लवलेशही आढळत नाही. त्याला स्थल, काल वा क्षेत्राचे बंधन नाही, ज्ञान प्राप्तीचा महामार्गच वेदांनी प्रशस्त केला आहे. ज्या ज्या वेळी मी वेदांच्या सान्निध्यात असतो त्या त्या वेळी वसंत ऋतूच्या रात्री एका चमकदार प्रकाशाच्या छत्राखाली आहे, असे मला वाटत राहते.


एखाद्या उंच घाटमाथ्यावर आपण मुक्त विहार करीत आहोत अशा
अनुभूतीखेरीज दुसरी कोणतीच भावना हिंदू तत्वज्ञानातील कोणत्याही ग्रंथाचे कुठलेही वाक्य वाचताना माझ्या मनात जागृत होत नाही. कधी हे तत्त्वज्ञान वाळवंटाच्या रखरखाटातील थंड पाण्याची झुळूक वाटते, कधी गंगेतील प्रवाहासारखे भासते तर कधी विशेषतः टीकाकारांसमोर उत्तुंग माथ्याने उभ्या राहिलेल्या हिमालय पर्वताच्या शिख
रासारखे वाटते. आजच्या काळातही आपल्या परंपरागत आणि विशुद्ध देशी समृद्धीची झळाळी जशीच्या तशी टिकवून ठेवीत (हे तत्त्वज्ञान) संस्कृत इतक्याचसहजपणे इंग्रजी भाषेलाही आत्मसात करते. 


ज्यांना चांगल्या ग्रंथाचे वाचन करण्याची इच्छा आहे त्या सर्वांना मी आवाहन करतो की त्यांनीं चार्लस विल्कीन्स याने भाषांतरित केलेली भगवद्गीता जरूर वाचावी. विशेषतः इंग्रजी लोकांनी तर त्याचे श्रद्धापूर्वक वाचन करायलाच हवे... भगवदगीते समोरकधी  कधी मला शेक्सपिअरही तरुण वा किशोरवयीन विचारवंतच भासतो. पूर्वेकडील ज्ञानभांडाराची साधना (पश्चिमी) विद्वानांनी अजूनही चालू ठेवायला हवी, कारण पौर्वात्य भांडारातून जितके ज्ञान पश्चिमेने प्राप्त करायचे आहे त्यातील अनेक पैलू अद्याप आपणास (पश्चिमेला) मिळवायचे बाकी आहेत.

४ 
प्रातः काल मैं अपनी बुद्धिमत्ता को अपूर्व और ब्रह्माण्डव्यापी गीताके तत्वज्ञान से स्नान करता हूँ, जिसकी तुलना में हमारा आधुनिक विश्व और उसका साहित्य अत्यंत क्षुद्र और तुच्छ जान पड़ता है |

१०४ व्हर्नर हायझनबर्ग

                    १०४ व्हर्नर हायझनबर्ग 

नोबेल पुरस्कार प्राप्त जर्मन पदार्थविज्ञान शास्त्रज्ञ


भारतीय तत्वज्ञानाविषयी सखोल माहिती जाणून घेतल्यानंतर मला क्वांटम भौतिकशास्त्रातील पूर्वी अत्यंत विक्षिप्त वाटणाऱ्या अनेक संज्ञा, संकल्पना, समजून घेणे सुलभ झाले.

१०५ डॉ. अल्बर्ट आईन्स्टाईन

                      १०५ डॉ. अल्बर्ट आईन्स्टाईन
 वैज्ञानिक संशोधनाच्या आणि सिद्धांतांच्या संदर्भात माझी मुख्य प्रेरणा आणि मार्गदर्शनाचा प्रमुख स्रोत  होता भगवद्गीता 

हम भारत के बहुत ऋणी हैं, जिसने हमें गिनती सिखाई, जिसके बिना कोई भी सार्थक वैज्ञानिक खोज संभव नहीं हो पाती ।


१०६ एडविन श्रोडिंगर

                              १०६  एडविन श्रोडिंगर 

नोबल पुरस्कार प्राप्त भौतिक शास्त्रज्ञ 


पाश्चिमात्य रक्तातील आध्यात्मिकतेचा अभाव भरून काढण्यासाठी
पूर्वेकडून कडून पश्चिमेकडे रक्ताभिसरण होण्याची नितांत आवश्यकता आहे.


व्यक्तित्वभाव आणि आणि समूहभाव (व्यष्टी आणि समष्टीभाव) यांच्यातील वैविध्याचे नेमके स्वरूप जाणून घेण्याचे कोणतेही परिणाम आपल्याला उपलब्ध नाही. जी जाणीव झाल्याचा भास होतो, तो केवळ तात्कालिक वा तात्पुरता असतो...या द्वंद्वाचे योग्य आकलन करून घेण्याचा एकमेव उपलब्ध मार्ग म्हणजे उपनिषदांद्वारे प्राचीन काळी व्यक्त झालेले मार्गदर्शन..

मंगळवार, ३ सप्टेंबर, २०१९

१०७ ह्युस्टन स्मिथ

                          १०७ ह्युस्टन स्मिथ 

प्राध्यापक, केलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले 

जेव्हा मी उपनिषदे वाचली तेव्हा मला एकूण विश्वव्यापाराविषयी सखोल ज्ञान प्राप्त झाले. 

१०८ डॉ. एरिक मिलर

                            १०८ डॉ. एरिक मिलर 

पेनसिल्व्हानिया विद्यापीठातील विद्वान अभ्यासक 

जगातील सर्व राजकीय नेते आणि अभ्यासक यांनी कवी कण्णगी तसेच पांडियन सम्राट नेदुत्चे झियन यांच्या चरित्रकथा अभ्यासल्या पाहिजेत. सिलाप्परथीकरम् या महाकाव्याचे नायक कण्णगी आणि नेदुत्चे झियन हेच दोघे आहेत. त्याने (राजा नेदुत्चे झियन याने) आपण चुकीचे वागलो आहोत हे लक्षात येताच स्वतःलाच शासन केले होते. अशी सत्ताधाऱ्यांनी स्वतःला शिक्षा करून घेण्याची परंपरा भारतीय इतिहासात जुनीच आहे. मनुनिधी चोलन नावाच्या राजाने आपल्या पुत्राला, त्याने एका वासराला ठार मारले म्हणून, कठोर शिक्षा दिल्याचे उदाहरण आहे. अशा परंपरा 
समाजजीवनात स्थिर झाल्या असल्यानेच  भारत हा आज जगाचा नैतिक बनू शकला आहे. 

१०९ गोएथ

                                        १०९ गोएथ

जर्मन कवी 

पृथ्वी आणि स्वर्ग या दोन्हींचा एकत्रित अनुभव घ्यायचा असेल तर माझे निर्विवाद उत्तर असेल ' शाकुंतल ' . 

११० कोफी अन्नान

                              ११० कोफी अन्नान 

संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव २०००

हिंदूंपाशी अनेक उदात्त आणि सार्वत्रिक हिताच्या संकल्पना आहेत. मात्र त्यांनी त्या त्यांच्यापुरत्याच ठेवल्या आहेत . या तत्वांचा प्रसार उर्वरित ५ अब्ज मानवांमध्ये करावा, धर्मांतर करण्याचा आग्रह न धरता त्यांनी हिंदुत्वाची महान मूल्ये जगभरात प्रसारित करावीत, असे आवाहन मी एक अब्ज हिंदूंना करतो. 

१११ अर्नोल्ड जोसेफ टॉयन्बी

                            १११ अर्नोल्ड जोसेफ टॉयन्बी

इतिहासकार, विचारवंत 

आजच्या अत्यंत मोक्याच्या क्षणी हे ध्यानात घ्यायला हवे की, मानवमुक्तीचा आणि मानवकल्याणाचा एकमेव मार्ग भारतीय विचारांचा मार्ग हाच आहे. त्याच विचारांत संबंध मानवता एकाच कुटुंबातील घटकांच्या भावनेने एकत्रितपणे सौहार्दाने नांदू आणि विकसित होऊ शकेल, असे सामर्थ्य आहे .