१३८ लहान कामे
१
संपूर्ण देशातील अव्यवस्था दूर करून तेथे सुव्यवस्था निर्माण करणे हेच संघाचे काम आहे. पण जे स्वतः व्यवस्थित आहेत असेच लोक हे काम करू शकतील. आणि व्यवस्थितपणासाठी आवश्यक असते व्यवस्थित मन. दुःख, राग किंवा मोह यांनी विचलित झालेले मन कसलेच काम नीट करू शकत नाही. आणि मन स्थिर करणे हे लहान कामे एकाग्रचित्त राहून करण्याच्या सवयीनेच शक्य होत असते.
२
अतिशय छोट्या छोट्या गोष्टींकडेही आम्ही नीट लक्ष दिले पाहिजे. थेंबाथेंबानेच जलाशय बनत असतो. तसेच छोट्याछोट्या त्रुटींमुळेच मोठी चूक होत असते. म्हणून शाखेत ज्या ज्या गोष्टी शिकविल्या जातात त्याचा छोटा अंशही नगण्य किंवा कमी महत्त्वाचा समजून नये. प. पू. श्रीगुरुजी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा