रविवार, २ फेब्रुवारी, २०२५

१४० सामान्य माणूस

                                       १४०  सामान्य माणूस 

         राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कल्पिलेल्या वैभवाच्या रूपरेषेत सामान्य माणसालाच प्रमुख स्थान दिले गेले आहे. सामान्य माणसाच्या राष्ट्रीय व व्यक्तिगत चारित्र्याची पातळी उंचावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सर्वसामान्य माणसाच्या जीवनात जितक्या प्रमाणात उत्कृष्ट गुण असतील तितक्या प्रमाणात देश मोठा व प्रगतिशील मानला जाईल.

        आपल्या कार्याची वृद्धी हे सर्व प्रश्नांना उत्तर होय. आपण निष्ठेने काम करीत राहिले पाहिजे. आपल्या अंतःकरणातील स्नेहभावनेचा स्पर्श, आपल्या बोलण्यातील गोडवा, यांचा लाभ झोपडी झोपडी पर्यंत पोहोचला पाहिजे. सर्वांना संघस्थानावर आणून आपल्या निरनिराळ्या कार्यक्रमातून आपण सर्व एका समाजाचे घटक आहोत ही भावना वागवून परस्पर सहकार्याने काम करण्याची प्रवृत्ती निर्माण करावी लागेल. संघ स्थानावरील हे चैतन्यमय  वातावरण आता घराघरात पोहोचले पाहिजे. प्रत्येक शाखेने त्या दृष्टीने आपली योजना करावी. वनवासी क्षेत्रात आपले कार्यकर्ते गेले आहेत. तसेच प्रत्येक शहरात दुर्लक्षित, मागासलेल्या वस्त्या आहेत. त्या वस्त्यापर्यंत आपण पोहोचले पाहिजे. आपल्या परिश्रमाने, अंत:करणातील सहानुभूतीने, अत्यंतिक स्नेहभावनाने आपण सर्वांची मने जिंकली पाहिजेत. कोणाचे मनात अविश्वास, गैरसमज, भीती असेल तर तीही आपल्या निस्वार्थ वागणुकीने दूर केली पाहिजे.

१३९ मेरी बिलबेन

                             १३९  मेरी बिलबेन - अमेरिकी गायिका, अभिनेत्री 


    दोन पवित्र भूमी मला प्रिय आहेत. पहिली आहे, पवित्र देश इस्राइल. आणि दुसरा देश आहे, भारत. सर्वांची मातृभूमी . 

शनिवार, १ फेब्रुवारी, २०२५

१३८ लहान कामे

                                    १३८  लहान कामे 

        संपूर्ण देशातील अव्यवस्था दूर करून तेथे सुव्यवस्था निर्माण करणे हेच संघाचे काम आहे. पण जे स्वतः व्यवस्थित आहेत असेच लोक हे काम करू शकतील. आणि व्यवस्थितपणासाठी आवश्यक असते व्यवस्थित मन. दुःख, राग किंवा मोह यांनी विचलित झालेले मन कसलेच काम नीट करू शकत नाही. आणि मन स्थिर करणे हे लहान कामे एकाग्रचित्त राहून करण्याच्या सवयीनेच शक्य होत असते.

        अतिशय छोट्या छोट्या गोष्टींकडेही आम्ही नीट लक्ष दिले पाहिजे. थेंबाथेंबानेच जलाशय बनत असतो. तसेच छोट्याछोट्या त्रुटींमुळेच मोठी चूक होत असते. म्हणून शाखेत ज्या ज्या गोष्टी शिकविल्या जातात त्याचा छोटा अंशही नगण्य किंवा कमी महत्त्वाचा समजून नये.                                                     प. पू.  श्रीगुरुजी

१३७ हिंदू चेतना जागृती

                                            १३७ हिंदू चेतना जागृती 


       बंगाली, सिंधी, आसामी, बौद्ध, जैन, लिंगायत ही सर्व व्यापक हिंदू अस्मितेची अंशतः प्रगत रूपे आहेत. आणि त्याचप्रमाणे शरीर प्राणहीन झाल्यावर त्याच्या विभिन्न अवयवांमध्ये हालचाल होत नाही किंवा त्यांच्यात कसलाच ताळमेळ किंवा सामंजस्य राहत नाही, त्याचप्रमाणे समाज मृतवत झाल्यावर त्याच्या विभिन्न अवयवांमध्ये काहीच ताळमेळ वा सहकार्य उरत नाही. हिंदू समाजाची सुप्त चेतना जागी करणे हेच संघाचे काम आहे.

      ' गर्व से कहो हम हिंदू है ' या घोषणेत हिंदू समाज जागृत, एकीकृत नि कार्यरत होत असल्याचे चिन्ह आहे. तिच्या ध्वनीत नि प्रतिध्वनीत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना नि विचारवंतांना आपले मनोगत ऐकू यावे हे स्वाभाविकच. आपले ध्येय व स्वप्न, आपले तत्वज्ञान नि आपल्या इच्छा आहे त्यांना अशाच सतत ऐकू आल्या पाहिजेत. विचार असा जिवंत राहिला, गाजत राहिला तरच आचाराला योग्य दिशा मिळेल.