१४१ परिवर्तन
१
आपण ' परम् वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं ' ही आकांक्षा ठेऊन चाललो आहोत. आपण समाजात परिवर्तन करू इच्छितो. ' मी माझ्यात परिवर्तन घडवून आणले आहे ' अशा प्रकारे छातीठोकपणे आमचा स्वयंसेवक सांगू शकेल अशी स्थिती उत्पन्न व्हावी याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
२
आपला विशाल जनसंख्या असलेला प्राचीन समाज आहे. त्याचे प्रश्नही तसेच विशाल आहेत. त्यामुळे दुःख होणे स्वाभाविक आहे. परंतु अत्यंत परिणामकारी व लागलीच प्रभावी होणारी उपाययोजना करणे शक्य नाही. अत्यंत धीराने अधिक कार्यकर्त्यांना कार्यरत करून, त्यांच्याबरोबर अधिक हिंदू बंधूंना जोडून हे कार्य करणे आवश्यक आहे. संघाच्या माध्यमातून अनेक प्रकारचे प्रवाह समाजात उत्पन्न झाले आहेत. या प्रवाहांद्वारा समाजात परिवर्तन व्हावे असा आपला दृष्टिकोन आहे. या प्रवाहांचा वेग वाढला तर परिवर्तन लवकर होईल. प. पू. बाळासाहेब देवरस
३
जितना बडा लक्ष्य, उतनीही बडी प्रेरणा और उतनाही लंबा पथ | छोटे रास्ते से बडा काम नही हो सकता | परिवर्तन बातों या बातें बनाने-बदलने से नहीं आता | परिवर्तन की पहिली शर्त है भविष्य के प्रती पूर्ण आस्था और अपने कर्म पर भरोसा | निर्माण निहोरा देनेसे नहीं होता | निर्माण का प्रथम बिंदू है साध्य का स्पष्ट ज्ञान | साधना, विद्या और मार्ग पर विश्वास | वर्तमान को अतीत के दृष्टि से नहीं, अतीत को आधुनिक संदर्भ प्रदान करने से ही भविष्य युगानुकुल वर्तमान बनकर धरती पर उतरता है |
४
आज मानवी जीवन एका महान परिवर्तनाच्या सीमा रेषेवर येऊन ठेपले आहे. जे संकल्प आज रुजविले जातील, जे जे प्रयोग केले जातील आणि ज्या ज्या प्रेरणा आम्ही ग्रहण करू, त्या सर्वांना एक भव्य, व्यापक आणि तेजस्वी संस्कृतीचा रूप लाभेल. परंतु यासाठी श्रद्धा हेच आपले सर्व मानणाऱ्या प्रयोगवीरांची आवश्यकता आहे; पण मनुष्य जर शुद्र वासना आणि तुच्छ आदर्शांना शरण गेला आणि जर उच्च महत्त्वकांक्षेसाठी शास्त्रीय निष्ठा आणि संन्याशाच्या निश्चिंततेने सर्वस्व समर्पण करण्यास कचरला तर ही सुसंधी अगदीच वाया जाईल. ( हा मोसम अगदीच व्यर्थ जाईल ) परंतु जर महासागराच्या भयानक वादळातही उडी टाकण्याची तर माणसाची हिंमत असेल, प्राण पणास लावण्याची त्याची तयारी असेल तर तो नि: संशय ज्याची कधी कल्पनाही केलेली नाही अशा महान संस्कृतीचा आणि अलौकिक प्रगतीचा स्वामी बनेल. काका कालेलकर
५
ज्या क्षेत्रातून गंगा वाहते तेथील भूभाग कधी ओसाड राहू शकत नाहीत. जमिनीस सुजला, सुफला, सस्यश्यामला बनविण्यासाठी गंगेचे पाणी अनेक कालवे, पाट यांच्या द्वारा सर्वत्र नेले जाते. अशाच प्रकारे जिथे जिथे संघगंगा वाहते आहे तेथे तेथे सभोवतीच्या हिंदू समाजात परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही. समाजाची एकता आणि प्रगती यांच्या मुळावरच घाव घालणाऱ्या गैरसमजुती, रुढी, लोकांचार यासारख्या अपप्रवृत्ती हळूहळू नष्ट होत जातात. त्यांची जागा निकोप सामाजिक व्यवहारांना संजीवनी देणाऱ्या दृष्टिकोनाने आणि निकषांनी घेतलेली असते. कोणताही सामाजिक पैलु दृष्टीआड होणार नाही अशा सामाजिक परिवर्तनाचे चित्राने प्रेरित होऊन, अग्रणी होऊन स्वयंसेवकांना प्रगतीपथावर पुढे जायचे आहे.