गुरुवार, ४ जून, २०२०

९५ प्रा. ओकुरावा

                                                                   ९५  प्रा. ओकुरावा 

ज्या काळात कालिदासाचा स्वर गुंजन करीत होता . वराहमिहीर खगोल शास्त्रातील उंच उंच शिखरे गाठीत होता असा सातव्या शतकातील ज्ञानाचे विद्यापीठ  ' नालंदा '  या केंद्राभोवती विकास पावणारा हा काळ भारताच्या सर्वश्रेष्ठ बुद्धीवैभवाचे युग बनला होता .                                  

८९ विल ड्युरांट

८९  विल ड्युरांट 

भारत हि केवळ भारतीयांच्याच नव्हे तर आमच्या वंशाचीही मातृभूमी होती व संस्कृत ही सर्व युरोपियन देशांची मातृभाषा . भारताने आम्हाला अरबांतर्फे गणित दिले, बुद्धाच्या रूपाने ख्रिश्चन पंथामध्ये दिसत असलेली करूणा  दिली . ग्रामसंस्थांच्या रूपात स्वयंशासित समाजाची कल्पना लोकशाही भारताने आम्हाला दिली . भारताचे तत्वज्ञान हे तर आमच्या तत्वज्ञानाचा मूलस्रोतच आहे . भारतमाता ही अनेक अर्थाने सर्वांचीच माता आहे . 

९४ ह्यू शीह

                                                                                ९४  ह्यू शीह 

भारताने गेली दोन हजार वर्षे एकही सैनिक न पाठविता चीनवर सांस्कृतिक प्रभाव निर्माण केला . आपली संस्कृती भारताने शेजारी राष्ट्रावर कधीच लादली नाही . स्वतः च्या उत्सुकतेतून, स्वतःहूनच शिक्षण घेऊन चीनने या संस्कृतीचा स्वीकार केला .                                      ( चीनचे अमेरिकेतील राजदूत )

९६ लेस

                                   ९६  लेस 

१ 
पूर्वीच्या काळात भारतीयांनी जलनौका बांधण्यात प्राविण्य मिळविलेले आहे . आज सुद्धा हिंदू इंग्लंडला जहाजांसाठी नव्या रचना पुरवू शकतात . इंग्रजांनी हिंदूंच्या पासूनच नौकांमध्ये सुधारणा करण्यासाठी अनेक कल्पना उचलल्या आहेत . हिंदूंच्या नौकांमध्ये सौंदर्य आणि उपयुक्तता यांचा सुरेख समन्वय आढळतो . सातत्यपूर्ण प्रयत्न व सुरेख कारागिरी यांचे हे उत्कृष्ट नमुनेच आहेत . 

९७ अल जहिज

९७  अल जहिज 

१ 
खगोलशास्त्र, गणित वैद्यक आणि अनेक विज्ञान शाखांमध्ये हिंदू प्रवीण आहेत . शिल्पे, चित्रकला व वास्तुकला यामध्ये त्यांनी पूर्णत्व मिळवलेले आहे . त्यांच्यापाशी काव्य, तत्वज्ञान, साहित्य व नैतिक मूल्यांची समृद्धी आहे . हे लोक न्यायी आणि शूर आहेत . स्वच्छता व शुचिता हे त्यांचे सद्गुण आहेत. अध्यात्म्याची तर त्यांच्या बरोबरच वाढ झाली आहे .                                                 (  ९ वे शतक  )