शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०२२

७८. देशभक्ती

 

                                                              ७८ . देशभक्ती

१ . पू. डाॅ. हेडगेवार म्हणतात,                 

    संघाच्या ध्येयाची पूर्तता करण्याकरता आपल्याला काय केले पाहिजे याची नीट जाणीव प्रत्येक स्वयंसेवकाने करून घेतली पाहिजे. आपल्यापैकी प्रत्येकाची हीच भावना पाहिजे की मी आणि माझे कर्तव्य संघाकरता म्हणजेच राष्ट्रकरता आहे. प्रत्येक स्वयंसेवकाच्या नसानसांत देशप्रेमाची भावना असली पाहिजे. स्वयंसेवक केवळ हंगामी देशभक्त असून उपयोगी नाही. सर्व स्वयंसेवकांची वृत्ती जर याप्रमाणे संघमय झाली तर आपले ध्येय आपण लवकर  गाठू शकू.

  आम्ही राष्ट्र देवतेच्या उपासनी लागलो आहोत. यासाठी तन-मन- धनबुद्धीचित्त तसेच जे काही ईश्वर कृपेने आपणाला मिळाले आहेते सर्व त्याला समर्पित आहे. या प्रकारच्या शुद्ध भावनेला आम्ही आपल्या अंत करणामध्ये चांगल्या प्रकारे निर्माण करू आणि त्याचा विसर कधीही पडू देऊ नये.                                   - योगी अरविंद घोष