शनिवार, २६ जानेवारी, २०१३

विवेकानंद अमृत


                            विवेकानंद अमृत 

नमस्कार,
     स्वामी विवेकानंदांच्या सार्ध शती संवत्सर प्रारंभाच्या आजच्या मंगल पूर्वसंध्येला आपणा सर्वांना सादर प्रणाम !
     स्वामी विवेकानंद भारतमातेचा अद्वितीय सुपुत्र . भगवान श्रीरामकृष्ण यांचा प्राणोत्तम शिष्य . आपणा सर्वांचा पथ परिचायक .  
     संन्यास घेतल्या नंतर त्यांनी भारत भ्रमण केले. कन्याकुमारीच्या श्रीपाद शीलेवर बसून भारत मातेचे दर्शन घेतले. साता समुद्रापलीकडे जाऊन भारत मातेचा, हिंदू  धर्माचा जयजयकार केला.
     भारत देश, हिंदू धर्म व समाज यांच्या विषयी स्वामीजी भरभरून बोलले आहेत.त्यांचे विचार हे ईश्वरीय संचित.माणसाला चरैवेति बनविणारे संप्रेरक. आजपासून ह्या विवेकानंद विचाररसाचे अमृतपान आपण करूया.

                                                                                   कौतुक बाळे