शनिवार, २४ मार्च, २०१२

अन्तःचक्षुंनी बघत काम करणारी सरपंचा

आज एक बातमी वाचनात आली.
कथा आहे गुजरातमधील आणंद जिल्ह्यातील चांगा गावची.
१९९५ मध्ये सुधा या महिलेने सरपंच पदाची निवडणूक लढविली.
गावातील लोकांचा तिला प्रचंड विरोध असूनही ती जिकली.
आशियातील पहिली महिला सरपंच होण्याचा मान तिला मिळाला.

मोठ्या हिकमतीने तिने काम सुरु केले.
आज तिने आपल्या सगळ्या गावाचा कायापालट करून टाकला आहे.
विशेषतः शिक्षणात तिने केलेले कार्य अमोलिक असेच आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे हि महिला अंध आहे.

काल गोव्यातील स्थानिक वाहिन्यावर एक बातमी दाखवीत होते.
गोव्यातील एका पंचायतीत गटाराचे काम केले गेले.
काही दिवसांनी परत एकदा तेच टेंडर काढले गेले.
म्हणजे केले गेलेले काम पुन्हा दाखवून संपूर्ण पैसे खाण्याचा डाव होता.
काही जागृत नागरिकामुळे हा डाव फसला.

या गैरव्यवहार जाहीर झाला. प्रसार माध्यमांकडे गेला.
विचारल्यावर ती सरपंच बाई निर्लज्जपणे सांगते कि ते मला दिसलेच नाही.
नागरी स्वराज्य संस्थाकडे नेहमीच निधीची कमतरता असते.
असे असताना इतक्या बेफिकीरीने टेंडर काढले गेले ?
अजिबात नाही, हे सगळे ठरवून झालेय.
हा सगळा भ्रष्टाचाराचा खेळ आहे.

डोळ्यांनी दिसत नसूनही अन्तःचक्षुंनी बघत काम करणारी ती सरपंचा कुठे ?
आणि दिसत असूनही पैसे खाण्यासाठी अंध बनलेली हि निष्क्रीय सरपंचा कुठे ?