मोठी माणसे नेहमी साध्याकडे बघतात.
साधनांकडे त्यांचे फारसे लक्ष नसते.
आपल्या कार्यात म्हणूनच ती नेहमी यशस्वी झालेली दिसतात.
स्वातंत्र्यानंतर समस्यांवर उत्तरे शोधायचे दायित्व भारतीयांवर आले.
पहिली प्राथमिक गरज अन्न.
अन्नाचा प्रचंड तुटवडा,
आणि वाढता वाढता वाढे .... उत्साही लोकसंख्या.
लोकसंख्येवर नियंत्रण आणणे महत्वाचे.
नसबंदी शस्त्रक्रियेचा विचार पुढे आला.
नसबंदी शस्त्रक्रिया शिबिरे घ्यायची ! मोठ्या प्रमाणात.
पहिले शिबीर मुंबईत, विरारला. साल १९६२-६३
आदल्या दिवशी डॉ. पुरंदरे तयारीचा आढावा घेऊ लागले.
रुग्ण, औषधे, सहाय्यक, उदघाटन सोहळा एकेक काम हातावेगळे करू लागले.
अकस्मात लक्षात आले कि शस्त्रक्रिया टेबल नाहीये.
आहे ते छोटेसे, तीन पायांचे. आता करायचे काय?
डॉक्टरांनी आजूबाजूला बघितले. बाहेर शेगट्याचे झाड दिसले.
शेगट्याच्या फांद्या सरळ असतात.
फांद्या कापून आणल्या . टेबल तयार झाले. आंणी....
शस्त्रक्रिया शिबिरातली शुभारंभी शस्त्रक्रिया शेवगा शय्येवर संपन्न !